केज येथील नामांकित MS-CIT सेंटर न्यू इंटेल कॉम्प्युटर्स येथे स्वराज्य प्रेरिका जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.

सांस्कृतिक विशेष
वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
केज /प्रतिनिधी
केज शहरात मागील 22 वर्षांपासून कार्यरत असलेले नामांकित MS-CIT सेंटर न्यू इंटेल कॉम्प्युटर्स केज येथे स्वराज्य प्रेरिका जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालिका श्रीमती विजया सत्वधर यांची तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद शिनगारे व श्री मनोराम पवार यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्या थोर माऊलीमुळे महाराष्ट्राला दोन छत्रपती मिळाले या प्रेरणादायी मातेस विनम्र अभिवादन करताना सर्वांना नक्कीच एक ऐतिहासिक उर्जा निर्माण होते व दैनंदिन जीवनात आदर्श जीवन जगण्यासाठी मार्ग सापडतात आशा माऊलीस सेंटर मधील संचालक , विद्यार्थी या सर्वांनी विनम्र अभिवादन केले व
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिनगारे व पवार यांनी प्रतिमापुजन केले आणि आपले मनोगत सांगितले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिश्रम घेतले व यशस्वीपणे कार्यक्रम पार पडला ..