मांजरा विकास प्रतिष्ठानच्या वतीने सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
मांजरा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रविण खोडसे व पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी पुढील कार्यास दिल्या शुभेच्छा

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज प्रतिनिधी
केज तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा मांजरा विकास प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्रविण खोडसे व पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी डॉ जावेद शेख यांची संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या व यावेळी संघाचे पदाधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला असून . यावेळी युवा नेते सामाजिक कार्यकर्ते प्रविण खोडसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या संघाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील व
केज तालुक्यातील विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या संघाचे कार्य विशेष राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत तसेच सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्भीडपणे हा संघ काम करेल असे मनोगत व्यक्त करताना पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी आपले विचार व्यक्त केले सहयाद्री मराठी पत्रकार संघ व सामाजिक संघटना ह्या समाजाचे वास्तव प्रश्न पटलावर आणुन समाजहितासाठी कायम कटिबद्ध असतात याच उद्देशाने संघाची स्थापना करण्यात आली असुन संघाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकरी, कामगार ,कष्टकरी सामाजिक कार्या प्रसिद्धीसाठी आमचा संघ सदैव तत्पर असणारा आहे . सह्याद्री मराठी पत्रकार संघ भविष्यात समाजहितासाठी कायम कटिबद्ध आसेल याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.डॉ.जावेद शेख यांनी सांगितले.व मांजरा विकास प्रतिष्ठानच्या वतीने सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करुन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .