शाहिर दिप्ती सावंत यांचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार 2023 ने विशेष सन्मान
मानाचा राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार प्राप्त

सन्मान कर्तृत्वाचा सोहळा
___________________________
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
वैभवशाली महाराष्ट्र न्युज
मराठा सेवा संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर येथील शिवशाहीर दिप्ती दिलीप सावंत यांना “राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार 2023” हा विशेष राज्यस्तरीय सन्मान देऊन 12 जानेवारी रोजी मराठा सेवा संघाच्या कोल्हापूर येथील विशेष पदाधिकारी , मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला असून दिप्ती सावंत वयाच्या 9 व्या वर्षांपासून वडील शाहीर दिलीप सावंत यांच्याकडून शाहीरीचे शिक्षण घेऊन शाहिरी परंपरा जोपसण्यास सुरुवात केली तसेच शाहिर विशारद पिराजीराव सरनाईक यांच्या परंपरेत शाहिरी सादर करणारी दिप्ती सावंत हि अॅटोमोबाईल इंजिनिअर आहे ती राज्याभरात राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज , महाराणी ताराराणी , राजर्षी शाहू महाराज , सावित्रीमाई फुले , अहिल्याबाईं होळकर यांच्या विचारांचा जागार आपल्या शाहिरीच्या माध्यमातून करत आहेत सदरील मानाचा राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शाहिर दिप्ती सावंत यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे ..