निलंगा येथील ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ सगरे यांची लातूर जिल्हा शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड .
मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार यांनी केले अभिनंदन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
उदगीर प्रतिनिधी
निलंगा येथील ज्येष्ठ पत्रकार व निलंग्याच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात व इतर सर्वांच्या सहवासात राहणारे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारेलोकप्रिय असलेले निलंगा येथील ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ सगरे यांची लातूर जिल्ह्याच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. त्यांचे समाजातील विधायक कार्य पाहून त्यांची ही निवड शिवाजीरावपांढरे यांनी शिवसेना भवन मुंबई येथून निवड केली आलीआहे . त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुक्त पत्रकार तथा टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे नूतन उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .पत्रकार हरिभाऊ सगरे यांची लातूर जिल्ह्याच्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांमध्ये व शैक्षणिक सामाजिक राजकीय पक्षांमध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून त्यांचे ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले. दर्शनाताई घुले .राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख तथा न्यूज सी.चे मुख्य संपादक जाफर खान शेख. 24 चॅनलचे लातूर जिल्ह्याचे प्रमुख सुभाष तगाळे उदगीर येथील राजधर्माचे ज्येष्ठ पत्रकार अंबादास आलमखाणे. विश्वकर्मा महामंडळाचे युवा अध्यक्ष सुदर्शन बोराडे व ओबीसी हक्क परिषद दिल्ली शाखा लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष मोहन पोद्दारयांच्यासह इतरांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदनकेले असून पुढील कार्यास त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.