आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त शिव प्रेमीच्या वतीने विनम्र अभिवादन

शिवसेना जिल्हा संघटक नितीन भैया धांडे यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत बियाणे वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा -२०२५

बीड /प्रतिनिधी

 

बीड दि.14 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त शिवतीर्थ येथे शिवप्रेमी च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्य प्रमाणे शिवसेनेचे वतीने अभिनव उपक्रमाचे आयोजन शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन भैया धांडे यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ येथे बीड जिल्ह्यातील शिव प्रेमींच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मोफत बियाणाचे वाटप जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम,डॉक्टर प्रफुल पाटील,बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर, नारायण गवते, राष्ट्रीय छावाचे जिल्हाध्यक्ष युवराज मस्के,अॅड विनायकराव जाधव, गोपाळ धांडे, मधुकर धांडे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अशोक सुखवसे, संजय गोडसे, पंजाबराव येडे, बापूसाहेब शिंदे, संतोष डोंगरे महाराज, श्रीकांत बागलाने, सुरेश ढास,आजिनाथ आदमाने,पंकज बाहेगव्हाणकर सतीश परदेशी राजू हरकुडे गणेश तिपाले दिलीप पवार राहुल जामकर यांच्या हस्ते बियाणांची वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी व शिवप्रेमी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.