वैभवशाली महाराष्ट्र न्यूजच्या अंबाजोगाई तालुका प्रतिनिधीपदी प्रा.दत्तात्रय जाधव यांची निवड
निवड झाल्याबद्दल स्नेही मित्र परिवार यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष…….!
बीड जिल्हा प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील सर्वांना सुपरिचित असणारे व शैक्षणिक , सामाजिक , क्रिडा , क्षेत्रासह विविध क्षेत्रात ज्यांचा विशेष परिचय असणारे प्रा दत्तात्रय जाधव आहेत . वैभवशाली महाराष्ट्र न्यूज ही मागील दोन वर्षांपासून सामाजिक , शैक्षणिक , कृषी , राजकीय , औद्योगिक सह विविध समृद्ध बातम्यांचा आढावा घेणारी न्युज मिडिय म्हणून नावारूपास आली असुन समाजहितासाठी कायम चांगल्या विषयांची बांधिलकी जपत आपले नाव जनसामान्यांच्या मनात कोरले आहे अशा वैभवशाली महाराष्ट्र न्यूजच्या अंबाजोगाई तालुका प्रतिनिधीपद प्रा. दत्तात्रय जाधव यांची निवड अंबाजोगाई येथे नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली असून यावेळी मुख्य संपादक गोविंद शिनगारे , कार्यकारी संपादक गोविंद लांडगे यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला असुन सदरील निवडीचे अभिनंदन करत पत्रकार मित्र तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत .