आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

मा. श्री रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने पैठण येथील चौधरी कुटुंबास आर्थिक मदतीचा हात

मा.श्री रमेश तात्या गालफाडे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

केज (प्रतिनिधी)

मा. श्री रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचा स्तुत्य उपक्रम !!

केज तालुक्यातील मौजे पैठण (सा) या गावी मागील काही दिवसांपूर्वी चौधरी कुटुंबीयांवर कोसळलेल्या आपत्तीमुळे दुखाचा डोंगर कोसळल्याने आणि त्यातच आल्पभुधारक शेतकरी असल्याने पैठण येथील कुटुंबाला शब्दांच्या आधारासह जीवनावश्यक साहित्य तथा हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे समोर उभ्या असलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पाठबळ मिळाले पाहिजे यासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज होती यात आजपर्यंत अनेकांनी शक्य ती मदत केली असुन हिच बाबा महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय , औद्योगिक क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते आसे सर्वसमान्यांचे समाजप्रिय नेतृत्व बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री रमेश तात्या गालफाडे यांना फोनवर पैठण येथील आपत्तीग्रस्त घटनेची माहिती सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून देण्यात आली असता सदरील कुटुंबास आर्थिक मदतीचा हात देऊन आपले दातृत्व दाखवले असुन याच प्रेरणादायी कार्यामुळे मा. रमेश तात्या गालफाडे यांच्याविषयी केज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडी नाव सातत्याने ऐकायला मिळत असते व सर्वसामान्याच्यां बदल आस्था असलेले नेतृत्व अशी भावनिक चर्चाही सर्वसामान्य नागरिक करताना दिसतात .

मा.श्री रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठानचे केज तालुक्यातील पदाधिकारी कार्यावाहक श्री रमेश पाटोळे , श्री .हनुमांत पाटोळे , शाहिर मधुकर कदम यांना पैठण येथे पाठवुन सदरील मदतीचे पॉकेट प्रतिष्ठानच्या वतीने चौधरी कुटुंबास देण्यात आले असुन यावेळी श्री चौधरी सर , सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी गोविंद नाना शिनगारे , मनोराम पवार , महादेव दौंड , यांच्या उपस्थितीत सदरील मदत देण्यात आली व यापुढेही शक्य असेल ते केज तालुक्यातील आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आधार देण्याचे काम समाजहितासाठी कायम कटिबध्द राहुन करण्यात येईल असे मत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. रमेश तात्या गालफाडे यांनी व्यक्त केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.