
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी
केज कृषी विशेष/: डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा एस एस के शेतकरी उत्पादक कंपनी युसूफवडगाव ( ता केज )येथे दि ३१ रोजी घेण्यात आली. या कार्यक्रमास बाबासाहेब जेजुरकर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बीड, सुभाष साळवे प्रकल्प संचालक आत्मा बीड,डॉ वसंत सूर्यवंशी कृषि विद्यावेत्ता अंबेजोगाई,डॉ दीप्ती पाटेगावकर कार्यक्रम समन्व्यक खामगाव, वसंत देशमुख कार्यक्रम समन्व्यक डिघोळआंबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे म्हणाले सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्याचा कल वाढत असून ती काळाची गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून विविध योजना सेंद्रिय शेतीसाठी सुरु आहेत त्या पैकीच डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही एक आहे या योजनेची संकल्पना, उद्देश राबविण्यात येणाऱ्या सेंद्रियबाबी याविषयी मार्गदर्शन केले यामध्ये ५० हेक्टर चा एक शेतकरी गट तयार करून एकत्रित १० गटाचे एक क्लस्टर व त्याचीच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन तयार करण्यात येणार असून त्या गटातील शेतकरी यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार आहेत जेणेकरून विविध निविष्ठा ते स्वतः तयार करून वापर करतील. त्यामुळे शेतकऱ्याचा अतिरिक्त होणारा खर्च कमी करता येईल बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक ते दोन क्लस्टर तयार झालेत शेतकरी यांचे सेद्रिय प्रामाणिकरण होणेकरिता आवश्यक ती कागदपत्र माहिती जमा करणे अपेक्षित असून सर्व अधिकारी यांनी काटेकोरपणे या योजनेची अंमलबजावनी करावीअसे मत व्यक्त केले.या कार्यशाळेस बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, उपविभागीय कृषि अधिकारी अंबेजोगाई शरद शिनगारे, केजचे तालुका कृषि अधिकारी सागर पठाडे, कृषि विज्ञान केंद्रचे नरेंद्र जोशी, श्रीकृष्ण झगडे एस एस के शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष शिवराज खरबड सर्व संचालक मंडळ,युसूफवडगावचे मंडळ कृषि अधिकारी नागेश येवले, मंडळ कृषि अधिकारी पी एस वाघमारे विकास अंभोरे, वर्षाराणी कदम, सर्व कृषि पर्यवेक्षक आर बी ठोबरे, पी सी कोठावळे, पी के राऊत, एस के जाधव, मानवलोक इरफान शेख सर्व कृषि सहाय्यक, लोणकरमॅडम शीतल गोरेमॅडम ,संजय गायकवाड राहुल मुळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.