जीवन शिक्षण शैक्षणिक संकूल मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन हर्ष पुर्ण वातावरणात साजरा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधी —
केज येथील जीवन शिक्षण शैक्षणिक संकुल येथे जीवन शिक्षण प्राथमिक ,माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय ,जीवन शिक्षण अस्थिव्यंग निवासी विद्यालय तसेच बंसल क्लासेस व जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी केज तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक मा.श्री.सुनिल (बापु) देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सायलीताई देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अस्थिव्यंग विद्यालयाचे ध्वजारोहण मा.नबीभाई इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.हारुण भाई इनामदार साहेब, नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड ,प्रा.हंडिबाग सर,जीवन शिक्षण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमाकांत ढाकणे सर,अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विनायक ठोंबरे सर , मा.नबीभाई इनामदार, राजू भाई इनामदार,जलालभाई इनामदार, विजय लांडगे, पद्मिनीताई शिंदे,रामचंद्र जाधव व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कु.शाश्वती कुंभकर्ण व कु.यशश्री कापरे या पाचवीच्या मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले व काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सिताताई बनसोड मॅडम ,विजय लांडगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.हारुण भाई इनामदार साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी विभागीय व जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत जीवन शिक्षण परिवारातील ज्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांचा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ज्यांची निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जीवन शिक्षण विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाकणे सर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी केल्यामुळे सर्व शिक्षकांचे अभिनंदन सचिव मा.हारूण भाई इनामदार यांनी केले . विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.