कानडी बदन येथे छ. शिवाजी महाराज जयंतीचे दैदिप्यमान स्वरुपात यशस्वी आयोजन संपन्न
केज तालुक्यातील ग्रामीण भागात शिवविचारांचा जागर तेवत ठेवणारे गाव

छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा 2023 विशेष
केज प्रतिनिधी
विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 जयंतीनिमित्त कानडी बदन येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये अनुक्रमे दिनांक: १७/०२/२०२३ रोजी सकाळी श्रमदान, रांगोळी स्पर्धा , तसेच
संध्याकाळी विद्यार्थ्यांचे भाषण स्पर्धा .
प्रमुख शिवव्याख्याते:शिवश्री देवा चव्हाण (बार्शी).
तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे गुण परीक्षक म्हणून वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक शिवश्री संतोष मोरे सर, राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय सावळेश्वर पैठण येथून शिवश्री गोविंद साखरे सर, प्रशांत सर हे उपस्थित होते.
दिनांक १८/०२/२०२३ भव्य शिबीर आयोजित करण्यात आले. त्या रक्तदान शिबिरामध्ये 38 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून एक थेंब स्वराज्यासाठी या संकल्पनेसाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख शिवव्याख्याते: शिवश्री हर्षद जी बागल
प्रमुख उपस्थिती:शिवश्री प्रा. डॉ. किसनजी शिनगारे (सांगली)
शिवश्री गोविंद नाना शिनगारे वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
(मुख्य संपादक)
तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवावी म्हणून सकल मराठा परिवाराचे महेश अंबाड, नवनाथ अंबाड यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन करून जिजाऊ वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यामध्ये शिवव्याख्याते देवा चव्हाण यांनी तरुणांना आव्हान केले की, त्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. आपल्या दररोजच्या जीवनात संस्कार जगले पाहिजे, तरुण पिढीने मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे यांनी तरुणांना आत्महत्या पासून कसे दूर राहावे यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची “दुःख अडवायला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा” ही काव्यपंक्ती समजून सांगितली तर शिवव्याख्याते शिवश्री हर्षद जी बागल यांनी तरुणांना नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले त्यामध्ये अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलुख आपला या शौर्यगाथेप्रमाणे अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलिया येथील व्यवसाय व तेथील संधी हे सांगितले घरात काय पिकतं ते पेक्षा बाजारात काय विकतं
यावर तरुणांनी व शेतकऱ्यांनी विचार करायला हवा असे आव्हान शिवश्री हर्षद जी बागल यांनी केले
१९/०२/२०२३ रोजी सकाळी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष रमेश (अण्णा) साखरे . यांच्या हस्ते शिवपूजन ,ध्वजारोहण करण्यात आले.
येणाऱ्या काळात जयंती विचारांची साजरी होईल छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संभाजी राजे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब , पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून जयंती विचारांची साजरी व्हावी असे अहवान शिवजन्मोत्सव समिती कानडी बदन यांनी केले आहे