केज नगरपंचायत कडून नागरिकांना राष्ट्रध्वज वितरण सोहळा संपन्न.

केज /प्रतिनिधी
केज नगरपंचायत मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. याअनुषंगाने केज नगरपंचायत कार्यालय मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सिताताई प्रदीप बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, मुख्याधिकारी सचिन देशपांडे,गटनेते राजूभाई इनामदार, सभापती सौ. आशाताई कराड, नगरसेवक पप्पू अण्णा इनामदार,नगरसेविका सौ. पद्मिनी शिंदे,नगरसेवक अजहरभाई इनामदार, नगरसेवक बाळासाहेब गाढवे आणी नगरपंचायत चे सर्व कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सर्व वार्डामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम हा कार्यक्रम राबवण्यात आला.आणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
नगराध्यक्षा सौ.सीताताई प्रदीप बनसोड यांनी तिरंगा याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच पुढे बोलताना सीताताई बनसोड यांनी नागरिकांना सांगितले की, हर घर तिरंगा प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावर तीन दिवस तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. त्यानंतर तिरंगा ध्वज उतरून व्यवस्थित आपल्या घरामध्ये कपाटात,अलमारीत व्यवस्थित घडी करून ठेवायचा जेणेकरून तिरंग्याचा अवमान होणार नाही.याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार यांनी शहरातील सर्वच नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाचे महत्त्व सांगितले.तसेच पुढे बोलताना हारुणभाई इनामदार म्हणाले की, जनविकास परिवर्तन आघाडी ही केज नगरपंचायत कडून तिरंगा झेंडा विकत घेऊन शहरातील प्रत्येक घर घरांमध्ये नागरिकांना तिरंगा झेंडा मोफत देत आहे. त्याकरता नागरिकांनी मार्केट मधून तिरंगा झेंडा विकत आणू नका असे देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्याबरोबर तिरंगा झेंडा कसा फडकवायचा व तिरंगा झेंड्याची दक्षता कशी घ्यायची हे देखील नागरिकांना हारुणभाई इनामदार यांनी समजावून सांगितले.
हर घर तिरंगा हा उपक्रम राबवीत असताना केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड आणी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून भाई इनामदार, नगरपंचायतचे सर्व नगरसेवक,कर्मचारी व जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व कार्यकर्ते शहरांमध्ये सर्व वॉर्डामध्ये जाऊन तिरंगा झेंडा प्रत्येकाच्या घरावरती फडकविला का व तिरंगा झेंडा सुरक्षित आणी व्यवस्थित आहे का याची पूर्णपणे दक्षता घेण्यात येणार आहे.तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नगरसेवक आणी नगरपंचायतचे कर्मचारी व जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.