मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता येडेश्वरी परिवार समाजाच्या कायम पाठीशी – बजरंग सोनवणे
येडेश्वरी कारखाना युनिट -१ चा १० वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न

केज (प्रतिनिधी ) महादेव दौंड
केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं १ चा १० वा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले,ह.भ.प.श्री. महादेव महाराज बोराडे, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज चव्हार यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने काटापूजन, गव्हानपूजन करून मोळी टाकण्यात आली. यावेळी येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर (बाबा ) भवर, बाळकृष्ण भवर, कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे संचालक दत्ता आबा पाटील, विलास काका सोनवणे, प्रमोटर डॉ.त्रिंबक चाटे, माजी जि.प.सदस्य शंकरआण्णा उबाळे,बालासाहेब दादा बोराडे,नंदूदादा मोराळे,माजी पंचायत समिती सदस्य नारायण दादा शिंदे,उमाकांत (अप्पा )भुसारी, पिंटू ठोंबरे, न.प. केजचे गटनेते भाऊसाहेब गुंड, हिंदी भाषिक सेलचे जिल्हाधयक्ष सय्यद शरीफ पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक, शेतकरी सभासद, बिगर सभासद, अधिकारीवर्ग, कर्मचारीवर्ग, वाहतूक ठेकेदार, तसेच असंख्य शेतकरीवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक येडेश्वरी कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सुरुवातीला वेगवेगळ्या आंदोलातून मराठा समाज युवकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आत्महत्या केली अशा युवकांना येडेश्वरी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. समाजाला दिशा देण्याचे आणि परिवर्तन करण्याचे काम आता करणे सध्या गरजेचे आहे. समाजाला दिशा देण्याच काम महाराज लोकच करू शकतात. आणि त्यांच्याच प्रबोधनाची सध्या समाजाला खूप मोठी जास्त गरज आहे असे ते म्हणाले. तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येडेश्वरीच्या माध्यमातून विनंती करतो कि या कठीण प्रसंगात आपण सर्वांनी येडेश्वरी परिवारासोबत राहावे. जे करून आपल्या ऊसाला जास्तीत भाव देण्याचे शक्य होईल बीड जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा येडेश्वरी जास्त भाव दिला आहे. यापुढेही यापेक्षाही जास्त भाव देण्याचे प्रयत्न बजरंगबप्पा सोनवणे यांचे चालू आहेत.
त्यानंतर ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज चव्हार,ह.भ.प.श्री. महादेव महाराज बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत येडेश्वरी परिवारास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणामध्ये येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे म्हणाले कि, १० व्या गळीत हंगामाची सुरुवात करीत असताना अनंत अडचणींना आपणाला सामोरे जावे लागणार आहे. या काळात आपण सर्वांनी सोबत राहून येडेश्वरी कारखान्याच्या प्रतिसाठी मदत करावी. वाईट काळात मागील दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांवर अशी वेळ आली होती कि आपला ऊस गाळपास जातो का नाही त्यावेळेस येडेश्वरी साखर कारखान्याने केज व अंबाजोगाई तालुक्यातील भागातील शेतकऱ्यांचा ऊस आणला. यावर्षी तुम्ही सर्वानी जास्तीत जास्त ऊस देऊन येडेश्वरी साखर कखान्याला सहकार्य करावे. मागच्या काळात येडेश्वरी कारखान्याने तुम्हाला मदत केली यावेळेस तुम्ही मदत करा असे आवाहन केले. तसेच मराठा समाज आरक्षणाचा तिढा आपण सर्वानी एकत्र येऊन लढू फक्त आत्महत्या करू नका असे युवकांना आवाहन त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता येडेश्वरी परिवार आपल्या सोबत आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण शिंदे यांनी केले.