कुंबेफळ ग्रामस्थांच्या गुणगौरव सोहळ्यातून यशवंतांना प्रेरणा
इस्त्रो व नासा सहलीसाठी पात्र ठरलेल्या वैभव पिसाळची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक

अंबाजोगाई (वार्ताहर)
कुंबेफळ ग्रामस्थांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यातून यशवंतांना प्रेरणा मिळाली. कारण, इस्त्रो (श्रीहरिकोटा) व नासा (अमेरिका) येथील अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या वैभव पिसाळची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रविवार, दिनांक 19 मार्च रोजी हा कार्यक्रम हनुमान मंदिर, कुंबेफळ (ता.अंबाजोगाई) येथे आयोजित करण्यात आला होता.
गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब बाबुराव बोर्डे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) हे तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदुरकर साहेब (जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी), आर.डी.गिरी (केंद्रप्रमुख), आर.व्ही.आवाड (केंद्रीय मुख्याध्यापक अंबासाखर कारखाना), बन्सी पवार (मुख्याध्यापक, जयप्रभा मा.विद्यालय, कुंबेफळ), श्रीमती एम.के.हजारे (मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा, कुंबेफळ), तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डी.एम.कसबे, एन.जी.जिरगे, श्रीमती एल.व्ही.जाधव, श्रीमती एम.आर.गुळभिले, श्रीमती एम.ए.अंबुरे, श्रीमती एम.व्ही.मुंडे, जी.एन.कांबळे, श्रीमती एम.एम.तोडकर, संतोष गायकवाड, श्रीमती एम.पी.सरवदे, एम.एम.गायकवाड, ए.एम.लांब आणि यावेळेस एन.डी.शिंदे (कार्यकारी अभियंता), नामदेव तोडकर (उपविभागीय अभियंता), विलासराव सोनवणे (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई.), भास्कर भाऊ भिसे (अध्यक्ष, कुणबी विकास मंच), धनराज काळे (अरूण मेडीकल), नवनाथ हुलगे, शिवाजी खोगरे (सचिव, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, कुंबेफळ.), मुरलीधर भाऊ लिंगे (चेअरमन, से.स.सो, कुंबेफळ.), लिंगेश्वर तोडकर (सरपंच, कुंबेफळ.), प्रमोद भोसले (उपसरपंच, कुंबेफळ.), प्रकाश तोडकर (उपाध्यक्ष, शा.व्य.समिती.) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळेस कु.वैष्णवी पिसाळ (सारथी शिष्यवृत्ती क्लॉ.), चि.वैभव पिसाळ (नासा प्रयोगशाळा व्हिजीट), चि.चंद्रकांत भागवत (भारतीय रेल्वे, असिस्टंटपदी) निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून त्यांचे वैजनाथ पिसाळ (विद्यार्थ्याचे आजोबा), सौ.हौसाबाई पिसाळ (विद्यार्थ्याची आजी), चंद्रसेन पिसाळ (विद्यार्थ्याचे वडील), सौ.संगिता पिसाळ (विद्यार्थ्याची आई), अभिमन्यु भागवत (विद्यार्थ्याचे वडील) आणि सौ.अनुसया भागवत (विद्यार्थ्याची आई) यांचा ही उपस्थित मान्यवरांकडून हृद्य असा सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरूप फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार असे होते. प्रारंभी इस्त्रो (श्रीहरिकोटा) व नासा (अमेरिका) येथील अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या वैभव पिसाळची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तर कार्यकारी अभियंता एन.डी.शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबेफळ येथील प्रतिभावान विद्यार्थी वैभव पिसाळ यास डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर आधारित “अग्निपंख” हे प्रेरक व चरित्रात्मक पुस्तक भेट म्हणून दिले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीमती एम.के.हजारे,
जयप्रभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी पवार, शिक्षिका श्रीमती एल.व्ही.जाधव, शिक्षक एन.जी.जिरगे, शिक्षक डी.एन.कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर वैभव चंद्रसेन पिसाळ याने सत्काराला उत्तर दिले. प्रमुख अतिथींनी मौलिक विचार मांडले. बालासाहेब बोर्डे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते व्यंकट किर्दंत व शिक्षक गणेश तौर यांनी केले, तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव डोईफोडे यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार उपसरपंच प्रमोद भोसले यांनी मानले. या कार्यक्रमास कुंबेफळ येथील शिक्षणप्रेमी नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जाणकार, नामवंत अधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.