सह्याद्री मराठी पत्रकार संघ केजच्या वतीने पैठणच्या चौधरी कुटुंबियांना आर्थिक मदत
संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख यांनी वाढदिवस साजरा न करता जपली सामाजिक बांधिलकी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/ प्रतिनिधी
केज तालुक्यातील पैठण (सा) येथील चौधरी कुटुंबीयांवर काळाचा घाला पडला आणि चौधरी कुटुंबीयावर अनोखी संकट ओढावले. या संकटातून सावरण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी काही ना काही या कुटुंबियांना आधार म्हणून सांत्वन तर केलेच परंतु काहींनी यांना मदत म्हणून आर्थिक आधार दिला.अशाच प्रकारे पत्रकारांच्या व भुमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी हे ब्रिद हाती घेऊन व सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात कायम कटिबध्द राहण्याचा संकल्प करुन केज तालुक्यातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख हे कायम सामाजिक बांधिलकीसाठी सदैव तत्पर असतात नुकताच यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले. अध्यक्ष यांनी आपल्या संघातील प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस हा समाजसेवा म्हणून एखाद्या कुटुंबाला आधार म्हणून काही रक्कम देऊन व अनाथ आश्रमातील व्यक्तींना फळे वाटप करून आणखीन काही समाजसेवा म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अध्यक्षांचा वाढदिवस हा नुकतीच जी पैठण येथील दुर्दैवी घटना घडली होती, त्यांच्या कुटुंबांना फक्त सांत्वन करून चालणार नाही तर आपण आपल्या संघातर्फे काही ना काही आर्थिक मदत करू म्हणून चौधरी कुटुंबीयांना कुटुंबाची भेट घेऊन प्रत्यक्ष संघातील सर्व सहकारी पत्रकार बांधवांनी मदतीचा वाटा उचलत रोख स्वरुपात आधार म्हणून मदतीचे आर्थिक पॉकेट देण्यात आले .
खरोखरच ही रक्कम त्यांची गरज भागवेल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर अशा प्रकारची मदत आपण करत राहिलो तर या कुटुंबांना आधार मिळेल कारण मुलांचे वडील शेतात पडल्यामुळे कमरेपासून अधू झालेले असल्याने त्यांना कुठलाही कामधंदा करता येत नाही त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे. ही गरज लक्षात घेता सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज च्या अध्यक्षांचा वाढदिवस साजरा न करता चौधरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. व यापुढेही संघाची वाटचाल समाजहितासाठी कायम कटिबध्द असेल असे मत उपस्थिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख , कार्याध्यक्ष मनोराम पवार , उपाध्यक्ष अनिल ठोंबरे , संघाचे प्रसिद्धी प्रमुख शहाजी भोसले , सचिव शिवाजी औसेकर , संघटक गोविंद शिनगारे , कोषाध्यक्ष महादेव दौंड , सहसचिव डॉ लतीफ शेख , संघाचे सदस्य दत्तात्रय भाकरे , गोविंद लांडगे , काशीनाथ कातमांडे , बळीराम लोकरे , बाळासाहेब घोगरे या सर्व संघातील पदाधिकारी यांच्या हास्ते आर्थिक पॉकेट देण्यात आले.