अतुल कसबे मित्र मंडळाचा विधायक पुढाकार ; सामाजिक भान राखत जनावरे व पक्षांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (वार्ताहर)
नैसर्गिक आपत्ती असो, किंवा कोविड – 19 ची महामारी असो अशा अनेक प्रसंगांत कायमच सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात पुढे करून दिलासा देण्याचे काम अतुल कसबे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येते. आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मित्र मंडळाने विधायक पुढाकार घेऊन तसेच सामाजिक भान राखत जनावरे व पक्षांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे.
याबाबत मित्र मंडळाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, युवा नेते अतुल कसबे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च न करता समाजहिताचे उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे वाढदिवसावर होणारा खर्च टाळून सामाजिक भान राखत जनावरे व पक्षांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अतुल कसबे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्री योगेश्वरी देवी मंदिरात महाआरती करण्यात आली, संघर्ष भूमी येथे सामूहिक बुध्द वंदना करून चनई येथील हजरत ख्वाजा शेख मसुद किरमाणी बाबा दर्गाह येथे चादर चढविण्यात आली. यापूर्वी ही दरवर्षी कसबे यांनी परिसरात वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच गरजूंना वेळोवेळी आवश्यक ती सर्व मदत केली आहे. एक कुशल संघटक म्हणून ही युवक कार्यकर्ते अतुल कसबे यांची अंबाजोगाई शहरात ओळख आहे. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवूयात असे आवाहन कसबे यांनी कार्यकर्त्यांना आणि मित्रांना केले होते. आगामी काळातील होणऱ्या निवडणुका होणार आल्याने शक्तीप्रदर्शन करून, वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार हल्ली अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र अंबाजोगाई शहर व परिसरातील युवा नेते अतुल कसबे यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या परंपरेला फाटा देत आपला वाढदिवस दरवर्षी प्रमाणेच यावर्षी ही लोकहिताचे उपक्रम राबवून आणि गरजू नागरिकांना मदत करून साजरा केला. माय सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी अतुल कसबे यांनी अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. गरजूंना अत्यावश्यक वस्तूंसह, अन्नधान्य देऊन त्यांना आधार दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना युवा नेते अतुल कसबे म्हणाले, वाढदिवस हा दरवर्षी येणार आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे जनावरे आणि पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. निसर्गाला सावरण्याची आपली जबाबदारी आहे. तसेच कोविड 19 मुळे अनेक नागरिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. पुढील काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी शिबिर राबविणार आहोत, तसेच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी खारीचा वाटा उचलणार आहोत. सध्याची परिस्थिती ही गरजूंना मदत करण्याची आहे. परिस्थितीची जाणीव ठेऊन विधायक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. असे कसबे यांनी सांगितले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक कुमार काळे, रमेश भाऊ सोनकांबळे, राजेंद्र कसबे, दिलीप साठे, कचरू साबळे, जगन्नाथ काळे, नारायणराव कसबे, शिवाजी सातपुते, किरण साठे, दिलीप सरवदे यांच्यासह युवा कार्यकर्ते प्रकाश ठोके, लखन काळे, बाबा वाघमारे, प्रताप देवकर, स्वप्निल सरवदे, शिवा भोसले, श्रीकांत वाघमारे, विनोद सरवदे, दिपक सांगळे, विकास सातपुते, राकेश काळे, ऋषिकेश वाघमारे, महेश वेदपाठक, स्वप्निल पारसे, अतुल सुर्वे, अजय कसबे, गौरव कसबे, प्रवीण काळे, युवराज काळे, बंटी गायके, सुशांत साठे, मोहम्मद पठाण, महादेव सरवदे, सौरभ चव्हाण, ईश्वर काळे, रवी कसबे, सिद्धार्थ साबळे, रोहित साठे, आयाज अन्सारी, समीर शेख, निकम, शंकर साठे, सुमेध शिंदे, आदित्य कांबळे, अक्षय साठे, सचिन होके हे उपस्थित होते.