बळीराजा सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा — मेघा खडके

बीड/प्रतिनिधी
डॉ जावेद शेख
महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय बीड च्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नियमित पीक कर्ज नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
100% पीक कर्ज नूतनीकरण हे उद्दिष्ट घेऊन वर्ष 2023-2024 च्या पीक कर्ज नोंदणी करण्याच्या कामाला वेग यावा त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय बीडच्या वतीने आज सकाळी दहा वाजता बँकेच्या नियमित कर्जदार यांचा सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय बीड, निलाई कॉम्प्लेक्स काकू नाना हॉस्पिटल समोर जालना रोड, बीड येथे ठेवण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.वासुदेव शेळके (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड) , मा. श्री.बाबासाहेब जेजुरकर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड), मा.श्री. गोपाळ कृष्ण परदेशी ( उपनिबंधक सहकारी संस्था बीड) विशेष उपस्थिती म्हणून मा. संतोष प्रभावती (सहाय्यक सरव्यवस्थापक नियोजन विभाग मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर)
यांची उपस्थिती राहणार आहे तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान नेकनूर येथील बँक व्यवस्थापक श्रीमती मेघा खडके यांनी केले आहे.