पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव येथे वृक्षारोपण संपन्न
वृक्षारोपण ही काळाची गरज --- डॉ. शशिकांत दहिफळकर

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
बातमी संकलन /डॉ जावेद शेख
केज तालुक्यातील पिंपळगाव येथील पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी श्री वडमाऊली शैक्षणिक, सामाजिक, संशोधन प्रतिष्ठान बीड संस्थेचे सचिव डॉक्टर शशिकांत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन श्री वडमाऊली शैक्षणिक सामाजिक संशोधन प्रतिष्ठान बीड संस्थेचे सचिव डॉक्टर शशिकांत दहीफळकर यांनी वृक्षारोपण करताना आपले विचार मांडले.
तसेच पुढे बोलताना डॉक्टर शशिकांत दहीफळकर यांनी सांगितले की,वृक्षारोपण करून वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत केली पाहिजे. वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल. वृक्षारोपण हे आपल्या काळाची गरज आहे. त्यामुळे वृक्षाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने वृक्षारोपण करणे हे गरजेचे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन करणे गरजेचे आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक वर्षी एक झाड लावले तर वातावरणात पसरत असलेल्या कार्बन डाय-ऑक्साइड आपोआप कमी होण्यास मदत होईल व ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष घोळवे बी.एम. (सर), पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव चे मुख्याध्यापक श्री ढाकणे एच. ए., बिक्कड बी.एल. ,ठोंबरे डी.बी., श्रीमती गायकवाड एस. के., श्रीमती शेख जे डी. मॅडम, श्री.राख व्हि.आर. ,ढाकणे सि.वाय., केदार व्ही. एन., भिलावेकर के .एम. शिक्षकेत्तर ठोंबरे व्ही. आर.,वाघमारे राहुल , वाघ अमोल उपस्थित होते.