आ.नमिता मुंदडांच्या नेतृत्वात माजी जि.प.सदस्यांच्या पुत्राचा भाजपात प्रवेश
विडा गटात भाजपला बळ तर राष्ट्रवादीला धक्का

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज ! प्रतिनिधी
माजी जिल्हा परिषेदेचे सदस्य बाबासाहेब पटाईत यांचे पुत्र युवा नेते ॠषीकेश पटाईत यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आ.नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वात जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली (दि-५) शनिवारी आंबेजोगाई येथे ग्रामपंचायतीचे सदस्य,सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व असंख्य कार्यकत्यांसह भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.
लोकनेते स्व.गोपिनाथरावजी मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून बीड परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब पटाईत यांना पूर्वी ओळखले जायचे त्यांच्या नंतर त्यांच्या पत्नी देखिल बीड जिल्हा परिषेदेच्या सदस्या राहिल्या त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने दहा वर्ष जिल्हा परिषेदेत राज्य केले आहे.त्यांचा वारसा पुढे चालवत असताना पुत्र ॠषिकेश पटाईत यांनी मध्यांतरी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले होते.परंतू शनिवार (दि -५) रोजी ॠषीकेश पटाईत यांनी राष्ट्रवादीला रामाराम करत केजच्या आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृवात व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेजोगाई येथिल आई निवास्थानी ग्रामपंचायतीचे सदस्य,सोसायटीचे सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्यांसह भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे विडा गटात भाजपला अधिकचे बळ मिळाले आसून राष्ट्रवादीला मात्र धक्का बसला आहे.प्रवेशा प्रसंगी महादूजी मस्के,हिंदूलाल काकडे,सुदाम पाटील,शरद इंगळे,शिवाजी पाटील,वसंत शिंदे,ग्रा.पं.सदस्य डाॅ.धनराज पवार,शिवाजी वाघमारे,प्रकाश रोमण,रवि नांदे,मच्छिंद्र जोगदंड,बारीक भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.