आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आदर्श शिक्षिका श्रीमती मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या नावे गुणवंत विद्यार्थ्यांना “मिराई स्कॉलरशिपचे” वितरण

मिराई प्रतिष्ठान चंदनसावरगावच्या वतीने शरद तपसे , गोविंद तपसे , महेश तपसे या भावांनी बहिणीच्या नावे सुरु केली शिष्यवृत्ती योजना

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज / प्रतिनिधी

चंदनसावरगाव येथे दि.15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरा होत असतानाच याच दिवसाचे औचित्य साधून मौजे चंदनसावरगाव येथे आपली मोठी बहीण आदर्श शिक्षिका श्रीमती मिरा शिवदास तपसे (शिनगारे) सम्राट (अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव) यांच्या नावे मा.शरद तपसे, गोविंद तपसे, महेश तपसे या भावंडांनी मौजे चंदनसावरगाव येथे “मिराई प्रतिष्ठाणची” स्थापन करुन भविष्यात शैक्षणिक , सामाजिक , आरोग्य इत्यादी समाजहितासाठी उपयुक्त असणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प करून आपल्या मोठ्या बहिणीच्या सामाजिक कार्याची संकल्पना हाती घेतली असुन भावांनी बहिणीच्या नावे सुरु केलेल्या कार्याचे कौतुक वाखाणण्याजोगे आहे .

मिराई प्रतिष्ठानाच्या वतीने यावर्षी प्रथम शैक्षणिक उपक्रम हाती घेत ज्या शाळेत श्रीमती मिरा शिवदास तपसे यांनी शालेय शिक्षण सदैव गुणवत्तेत येत 10 ला प्रथम क्रमांक पटकावला होता ती शाळा म्हणजे लाल बहादूर शास्त्री विद्यालय चंदनसावरगाव ता.केज या शाळेची गुणवंत विद्यार्थी म्हणून मिरा तपसे यांच्या कायम स्मृती आजही शिक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात एक गुणसंपन्न विद्यार्थी आसा नावलौकिक आपल्या शालेय जीवनात मिळवत तपसे परिवाची मान स्वाभिमानाने उंचावत ठेवण्यासाठी मिरा शिवदास तपसे यांनी आपल्या अथक परिश्रमाने नाव मिळवले होते .
महाविद्यालयीन शिक्षण वेणुताई महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथे तर बीएड हे शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे गुणवत्तेत पुर्ण करत शिक्षिका म्हणून गोटेगाव येथील सम्राट अशोक माध्यमिक विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरत 14 वर्ष करून समाजात आदर्श शिक्षिका म्हणून नाव प्राप्त केले होते अशा या कुशल व्यक्तीमत्वाला नियतीने आघात करत हिरावून घेतले परंतु याच आठवणींच्या हिंदोळ्यावर आज
शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या शाळेत 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपन्न होत असलेल्या दिनानिमित्त 2023 शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वीत प्रथम , द्वितीय, तृतीय आलेल्या यशस्वी गुणवंत मुलींचा गौरव “मिराई स्कॉलरशिप” व सन्मानचिन्ह 2023″ हि शिष्यवृत्ती लाल बहादूर शास्त्री विद्यालय चंदनसावरगाव कार्यक्रमाचे शाळेचे मुख्याध्यपक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . देशमुख डि.के सर व शाळेच्या सहशिक्षिका कार्यक्रमाच्या अतिथी श्रीमती अयोध्या घुले यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच मदन तपसे , गावचे सरपंच जालिंदर दळवी , उपसरपंच शंकर तपसे हे होते सदरील कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री बालासाहेब मदन तपसे सर यांनी करत उपस्थितांची मने जिंकली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री . केकान सर ,सपाटे सर ,खतिले सर ,पतरवाळे सर ,जाधव सर ,आकुसकर सर, कदम सर ,घाडगे मॅडम व मुख्य आयोजन महेश तपसे , गोविंद तपसे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थीनी *1) कु. संध्या कचरु तपसे प्रथम क्रमांक- रोख 5000 रु व सन्मानचिन्ह 2) कु.भक्ती नंदकिशोर तपसे द्वितीय क्रमांक- रोख 3000 व सन्मानचिन्ह 3) कु.अनन्या सत्यवान लोंढे द्वितीय क्रमांक – रोख 3000 रु व सन्मानचिन्ह 4 ) कु .आदिती अनंत तपसे तृतीय क्रमांक – रोख 2000 रु व सन्मानचिन्ह* देऊन यशस्वी गुणवंत विद्यार्थीनींना वरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात मिराई स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली .

आदर्श शिक्षिका स्व.मिरा शिवदास तपसे यांच्या शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील कार्याला व उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उपक्रमाने मिळाला उजाळा

आदर्श शिक्षिका श्रीमती मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर समाजहितासाठी कार्य केले चंदनसावरगावच्या मातृभुमीत स्व. शिवदास तपसे (नाना) यांच्या पोटी जन्म घेत आई- वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपली गुणवत्ता सदैव सिध्द करत आई वडील, भाऊ व पती गोविंद शिनगारे यांना आपल्या कुशलतेने सदैव उंचीवर नेण्याचे काम करत दोन्ही परिवाराला नावलौकिक मिळवुन दिला व महिला सक्षमीकरण करण्यासाठी आयुष्य वेचले अशा या कुशल व्यक्तीमत्वाच्या नावे मुलींना मिराई स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करुन सदैव आठवणीत ठेवण्याचे प्रेरणादायी कार्य मिराई प्रतिष्ठानने केले असुन आयोजक महेश तपसे ,शरद तपसे ,गोविंद तपसे , यांच्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत असुन सदरील शिष्यवृत्ती सन्मान सोहळा शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षकवृंद , विद्यार्थी , पालक , गावकरी समाजबांधव यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाला .

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.