मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त केज येथे विविध स्पर्धा संपन्न
स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उभा केला----अभिजित जगताप

केज (प्रतिनिधी)
केज मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त तहसील विभाग व गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने प्रश्नमंजुषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार रोजी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार अभिजीत जगताप म्हणाले विविध स्पर्धेमधून विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास उभा केला. वक्तृत्व स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास घडत जातो असे मत व्यक्त केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी कमलाकर खरात, विस्तार अधिकारी प्रमुख उपस्थिती सुनील केंद्रे, परीक्षक प्रा डॉ बाबासाहेब हिरवे,डॉ हनुमंत सौदागर,डी एल सत्वधर, श्री समुद्रे,धुरगुडे ,केंद्रप्रमुख श्री सारूक ,श्री कांबळे,श्रीमती दरबारे, जि प मा शा मुख्याध्यापक श्री शिंदे , श्री धनगर ,श्री गोसावी, श्री जाधव आदींची होती.
शुक्रवार रोजी सायंकाळी मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर अभ्यासक प्रा डॉ बालाजी चिरडे यांचे व्याख्यान होणार आहे त्या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धेतील विजेते प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिक ईखे, द्वितीय क्रमांक अक्षरा जोगदंड,तृतीय अभिषेक चवरे, उत्तेजनार्थ पंकजा जाधव, विशेष उत्तेजनार्थ अश्विनी शिंपले यांनी जिंकले. याचबरोबर प्रश्नमंजुषा आणि दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये संपन्न होणार आहे स्पर्धेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.