एक आगळी वेगळी सहल .. ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई – प्रसाद दादा चिक्क्षे
सामाजिक विशेष संपादकीय

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
संपादकीय / वैभवशाली महाराष्ट्र
बऱ्याच दिवसांनी धनगर वस्ती,फकीर वस्ती व गिरी वस्तीवरील मुलांची सहल विवेकवाडीला काढायचे नक्की झाले. काय काय करायचे हे पण ठरले.
सर्व मुलांनी स्वच्छ आंघोळ करून बरोबर १२.३० तयार राहण्याचे ठरले. १२ वाजल्या पासूनच मुलांचे फोन यायला सुरुवात झाली. शेख मामाची गाडी बरोबर १२.१५ ला आली. शुभमच्या कल्पने नुसार मुलांना भेळ बनवायला शिकवायची आणि तयार झालेली भेळ सर्वांनी मिळून खायची.त्याचे सर्व सामान विकत घेतले. मस्त खोबरीच्या वड्या पण घेतल्या.
सहलीचे ठिकाण हिरवीगार विवेकवाडी होते. आम्ही वस्तीवर पोहोंनचल्यावर मुलं तयारच होती. आज ती देखणी दिसत होती.सणाच्या दिवशी घालायचे खास कपडे आज त्यांनी घातले होते.चेहऱ्यावर प्रचंड उत्साह होता.
एकूण सगळे मिळून आम्ही २१ जण होतो. मस्तीतच आम्ही सगळे विवेकवाडीत पोहोंचलो. तिथला हिरवा निसर्ग सर्वांचे हसून स्वागत करत होता. अगदीच सुरुवातील डोलदार काळवीटाला पाहताच मुलं खुश झाली. विवेकवाडीतील झोपाळा आणि घसरगुंडी हे त्यांना हवेहवेसे होते. वास्तूच्या छतावर जाऊन हरणं पाहणे. आपली वस्ती नेमकी कुठे आणि किती छोटी दिसते हे ते समजून घेत होते.
सर्व काही झाल्यावर मग सर्वांनी मिळून भेळ बनवली व आनंदात खाल्ली. सगळ्यात शेवटी गोड खोबऱ्याची वडी खाऊन शेवट गोड केला.
ही सर्व मुलं कधीच सार्वजनिक उद्यानात पण गेलेली नाहीत. त्यांच्या आयुष्यात हा सुखद क्षण ज्ञान प्रबोधिनीचा पौरोहित्य गट आणि स्मिताताई आठवलेच्या (Smita Athavale )मदतीने ही अशी सहल मुलं अनुभवू शकले.असेच मस्त अनुभव मुलांना मिळतील.
शब्द संकलन .
मा. प्रसाद दादा चिक्क्षे
संचालक ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई