आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनवैभवशाली महाराष्ट्र न्युज

शहीद भगतसिंग जन्मदिनानिमित्त तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

शहीद भगतसिंग जन्मदिनानिमित्त डीवायएफआय युवक संघटनेच्या अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ऑक्टोंबर रविवार रोजीकरण्यात आले होते.सदरील स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या हेलिपॅड ग्राउंड वर पार पडल्या. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातून१२ संघांनी सहभाग घेतला.या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत मिर्झा 11 सोबत केजी एन 11 या संघामध्ये सामना झाला. मिर्झा 11 यांना प्रथम पारितोषिक मिळाले व केजी एन 11 या संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले.

शहीद भगतसिंग जन्मदिनानिमित्त दरवर्षी संघटनेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राभवले जाते. यावर्षी डीवायएफआय युवक संघटनेच्या अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धाआयोजित करण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा समन्वयक देवकते सर व क्रीडा शिक्षक अक्षय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिकचे वितरण अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. विजेत्या संघांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम पाच हजार रुपये ट्रॉफी देण्यात आली. तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 3000 रुपये ट्रॉफी देण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अजय बुरांडे, डीवायएफआय युवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव तालुकाध्यक्ष देविदास जाधव तालुका सचिव प्रशांत मस्के पत्रकार संतोष केंद्रे, पत्रकार संतोष बोबडे, राहुल भावठणकर,सचिन टिळक उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी जगन्नाथ पाटोळे सिद्राम सोळंके,मुखीद शेख, वाहेद मिर्झा,आसेफ शेख, अझर मिर्झा,अमोल गोचडे, फेरोज पठाण,मुजीब शेख,हसन शेख,संजय टिपरे,विजय पवळे,समाधान थोरात,राजू इंगळे, एजान शेख,जावेद शेख, नरेश चव्हाण,वसीम शेख,असलम शेख,यांनी मेहनत घेतली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.