स्वराज्य निर्मितीची मशाल राष्ट्रमाता जिजाऊ
12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव सोहळा 2023 विशेष लेख - लेखक रामकिशन मस्के सर

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
१२ जानेवारी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विनम्र अभिवादन !!!
ह्याच जिजाऊ ज्यांच्या प्ररणे उजळे स्वराज्य ज्योती |
ह्याच जिजाऊ ज्यांनी घडविले रयत आणि दोन छत्रपती ||
विखुरलेल्या समाज बांधवांना एकतेच्या सूत्रात गुंपून जगातले मोठे जनअंदोलन उभा करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या व्यक्तीमत्वात कर्तृत्व, धुरंधर, लढाऊ, न्यायी, निर्भीड इत्यादींचा ठसा प्रकर्षाने दिसून येतो. प्रभावी व रूबाबदार व्यक्तीमत्वाच्या जोडीला करारीपणा, प्रचंड आत्मविश्र्वास,ममता, वात्सल्य, करूणा, मुत्सदधीपणा, निर्णयशक्ती,संयम, तिव्र आत्मसन्मान, तल्लख बुधिमत्ता, दृढनिश्चय, विनयशिलता, सौदर्य, संघटन कौशल्य, महत्वकांक्षा, त्याग, निस्वार्थीवृत्ती अशा विविध गुणांचा संगम होता.
जिजाउंचा जन्म 12 जानेवारी 1598 विदर्भातील बुलढाणा जिल्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी राजे आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. इ.स. 1615 च्या सुमारास त्यांचा विवाह शहाजी राजे यांच्याशी झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवराय या थोर पुत्रास जन्म दिला.
राजमाता, राष्ट्रमाता जिजाउचा जीवनकाळ सन 12 जानेवारी 1598 ते 17 जुन 1674 होता. जिजाउ-शहाजींराजेंचा काळ धाम धुर्मीचा होता. महाराष्ट्रावर अस्मानी आणि सुलतानी संकट घोंगावत होते. महाराष्ट्र अदीलशाही, कुतुबशाही, निजामशाही अशा अन्यायी आणि जूल्मी ‘शाहि’ राजकारणात भरडून निघत होता. या शाहीमध्ये आप-आपसात लढाया होत. विजय कोणाचाही झाला तरी मरणारे मात्र मराठे असायचे. या आणि अशा मोगल सत्तांनी महाराष्ट्राची रयत उध्वस्त होत होती. स्त्रिीयां सुरक्षीत नव्हत्या. या अन्याय, अत्याचारांचा प्रतिकार कोणीच करत नव्हते. सारी रयत भयभीत झाली होती. अशा जूलमी अत्याचाराचा नि:पात करण्यासाठी जिजाऊ आणि शहाजी राजे शिवबांच्या माध्यमातून सज्ज झाले होते.
शहाजीराजे यांच्या सहकार्याने जिजाउंनी शिवबा वर कोणते संस्कार दिले ?
तोडून श्रृंखला, मुक्तकर मानवाला |
जिजाऊ प्रेरणा, देई शिवबाला ||
छत्रपती शिवरायांवरील संस्कार शहाजीराजे आणि जिजाउंनी शिवराय अनेक भाषेत पारंगत होण्यासाठी अनेक शिक्षकांची नेमणूक केली होती. लष्करी शिक्षणात तरबेज होण्यासाठी स्वत: जिजाऊंनी मोठी मेहनत घेतली तसेच बाजी पासालकर सारखे अनेक लष्करी शिक्षक नेमले. शिवराय अनेक विद्यांमध्ये तरबेज झाले.
जिजाऊंच्या संस्काराने शिवरायांमध्ये आपल्या विचारावर दृढ विश्र्वास अथक प्रयत्नांची तयारी, क्रांतीकारक विचारांची कास, असामान्य धैर्य सत्याची चाड, उच्च कोटीची नितीमत्ता साकारली.
जिजाऊंनी बाल शिवबाला आत्मविश्र्वास आणि प्रयत्नवादाच बाळकडू दिल. इंगीत विद्या मध्ये बाल शिवाजीला परांगत केले. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात 35 % पासून आरमार, घोडदळ यामध्ये 70 % ते 80 % मुस्लीम सैनिक होते. एका मुस्लीमाने छत्रपती शिवरायांशी आणि स्वराज्यांशी बईमानी केली नाही. हा वास्तव इतिहास आहे.
इ.स. 1630 मध्ये अदिलशाहाचा सरदार मनुवादी वृत्ती आणि अंधश्रधा पसरवून पूणे उध्वस्त केले होते. ते पूणे विश्र्वास आणि आत्मविश्र्वासाच्या जोरावर इ.स. 1636 मध्ये वसवले, पूणे या शहराची उभारणी केली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीचा प्रसंगी एक कनखर धाडसी आणि प्रचंड आत्मविश्र्वास देणारी माता दिसून येते.
इ.स. 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिद्दीजोहारच्या पन्हाळगडाच्या वेड्यातून मुक्तता करणे असेल. इ.सन. 1663 साली पुन्यात केलेली शाहिस्तेखानाची फजीती असेल 15 जून 1665 ला जयासिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पुरंदरचा तह असेल. इ.सन.1666 साली आग्रा या ठिकाणी औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवरायांची सुटका असेल 6 जून 1674 शिवराज्याभिषेक असेल अशा अनेक प्रसंगी एक सावध मुत्सद्धि, नियोजन करणारी, प्रचंड आत्मविश्र्वास देणारी कणखर अमलबजावणी करणारी माता म्हणून राजमाता राष्ट्रमाता जिजाउंचे शिवरायांना, स्वराज्याला, रयतेला मोठे योगदान लाभले आहे.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजही सर्व क्षेत्रात, सर्व गुणसंपन्न, सुसंस्कारीत केले.
मानवतेचा सर्वोच्च अविष्कार स्वराज्यात पहायला मिळतो. झोपलेल्यांना उठवले, उठलेल्यांना चालायला लावणे, चालणरांना पळायला लावले, सामान्य माणसांकडून असामान्य कार्य करुन घेतले. प्रत्येक मावळयात विश्र्वास आणि आत्मविश्र्वास निर्माण केला. मावळा म्हणजे आठरा पगड जात आणि मुस्लीम यातील सैनिक म्हणजे मावळा होय. शिवरायांच्या हातात तलवार भवानीने नाही तर जिजाऊनी दिली.
शिवरायांचे गुरु राजमाता जिजाऊं, शहाजी राजे, संत तुकाराम महाराज, बाबा याकुत, मौनिबाबा हे होते.
स्वराज्यात जात-पात मनुवाद गाडणारे, मानवतेचा आधार आणि दुर्जनतेचा कर्दणकाळ ठरणारे, शत्र्ूच्या स्त्रीचा सुध्दा सन्मान करणारी जगातली पहिली शासन व्यवस्था म्हणजे रयतेचे कल्याण्कारी स्वराज होय. आशा स्वराज्याच्या निर्मितीच्या मशालं होत्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि रयत यावर यथायोग्य संस्कार करुन जगाने दखल घ्यावी असे स्वराज्य निर्माण केले.
समारोप : आजच्या युवक-युवतीनी यातून योग्य बोध घेवून सामाजिक सलोखा, शेती व शेतकऱ्यांचा सन्मान, व्यसनमुक्त तरुण, करोना सारख्या महामारी मुक्त भारत, जागतिक दर्जाचा समाज इत्यादीसाठी सर्व समाज बांधवांचे योगदान महत्वाचे आहे. अशा उतुंग व्यक्तीमत्वाच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याला त्रिवार अभिवादन.
जिजाऊ उपास-तापास, कर्मकांड करणाऱ्या दैववादी नव्हत्या तर विज्ञानवादी, प्रयत्नवादी होत्या. स्वराज्यात अनेक किल्ले बांधले पण त्याची वास्तूशांती केली नाही. चमत्कार, कर्मकांड आशा भंपक गोष्टींना कोणतेही स्थान नव्हते भवानींची भक्ती म्हणजे लोककार्य हाच अर्थ होता.
आशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा मृत्यु 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी ‘पाचाड’ या ठिकाणी झाला.
शिवरायांच्या कर्तृत्वाची, तूच शक्तीपीठ |
तुच रचली माय जिजाऊ, स्वराज्याची वीट ||
जय जिजाऊ जय शिवराय
जय ज्योती जय भिमराय
#लेखक -शिवश्री रामकिसन गुंडिबा मस्के
मराठा सेवा संघ, जिल्हाध्यक्ष बीड (पूर्व)
तथा सहशिक्षक : नेताजी सुभाषचंद माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई जि.बीड
मो.न.9422930017