हारून भाई यांच्या सवांद यात्रेस केज मतदार संघात उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राजकीय वर्तुळातील घडामोडीही वेगाने घडू लागल्या आहेत.केज मतदार संघ ही यापासून दूर राहू शकत नाही. केज मतदार संघाचा राजकारणातला हुकमी एक्का म्हणून हारूनभाई इनामदार यांना ओळखले जाते.मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय लोकांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मनोज दादा जरांगे यांनी जे आंदोलन उभे केले आहे त्याला हारूनभाई इनामदार यांनी स्वतः भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.याच पद्धतीने नारायणगडावर मनोज दादा जरांगे यांच्या मेळाव्यास ही आपण 100 गाड्याचा ताफा घेऊन जात आल्याचे पत्रकार परिषदेत व नेकनूर च्या सवांद यात्रेतून स्पष्ट केले आहे. मराठा ,मुस्लिम, समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे .त्यामुळे आपण स्वतःहून आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे यांची ताकत वाढविली पाहिजे.तसेच येणाऱ्या काळात आपण मराठा ,मुस्लिम, मागासवर्गीय समाज आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत हारूनभाई इनामदार यांनी नेकनूरच्या सवांद यात्रेत म्हटले आहे.हारूनभाई गावोगावी सवांद यात्रा घेत असल्याचे पाहून मोठमोठ्या राजकारण्याचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
येणाऱ्या विधानसभेला मोठं मोठ्या राजकारण्यांना त्यांची जागा लवकरच केज मतदार संघाचा राजकारणातला हुकमी एक्का दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रत्येक गावात गवात चर्चा ऐकायला मिळत आहे. यावेळी संवाद यात्रेत केजच्या नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड सह नेकनुर पंचक्रोशीतील समाजबांधव तसेच तालुक्यातील मा हरुणभाई इनामदार समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते .