आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसांस्कृतिक

श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चिमुकल्या कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन येथील श्री संत नामदेव महाराज सभागृहा समोर शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामीण भागातील अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपल्या देखण्या शैलीत सुंदर नृत्य आविष्कार सादर केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचोली माळीच्या सरपंच सौ रोहिणीताई सुनील देशमुख या होत्या तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. रमेश भिसे साहेब, सचिव जनविकास सेवाभावी संस्था केज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र देशमुख, अॅड भुजंगराव गलांडे, माजी सुनील बापू देशमुख, ह .भ.प. आबा महाराज मेहकर, अशोक देशमुख, प्रमोद नखाते, ज्ञानेश्वर माऊली भांगे, कैलास भांगे, बापुराव तोंडे, संजय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, मंगल रामभाऊ गलांडे, चंद्रकांत भुजबळ, बालाजी भिसे, पत्रकार ज्योतिराम सावंत, रविंद्र मेटे, सचिन साखरे हे होते.

यावेळी बोलताना जनविकास सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा मा. रमेश भिसे साहेब यांनी शाळेविषयी गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सिमा काळे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सिमा काळे, शिक्षीका निलम जोगदंड, देशमुख मॅडम, खंदारे मॅडम, रेश्मा गायकवाड, प्रियंका शिंदे तसेच सेविका पुनम चंदनशिव यांनी कठोर परिश्रम घेतले.

यावेळी गावातील व परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.