सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवापुर्ती व पालक मेळावा उत्साहात संपन्न.
विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तरच भविष्य सुखमय जाईल--नंदकिशोरजी मूंदडा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज/ प्रतिनिधी
काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील श्री मोराळे आर.एस.व श्री.गदळे बी.टी.
अतिशय मनमिळावू, विद्यार्थी व पालक प्रिय, यांनी काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सेवा करत प्रदीर्घ सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवापूर्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम दि.१८-१२-२०२३ रोजी काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सखाहारी तात्या गदळे(संस्थापक अध्यक्ष शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ वडमाऊली) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी) होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. प्रमुख पाहुणे नंदकिशोरजी मुंदडा यांचा सत्कार काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे नुतन प्राचार्य राहुल गदळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आध्यक्ष श्री.सखाहरी तात्या गदळे यांचाही सत्कार करण्यात आला.
त्यानंतर काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.राहुल गदळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. प्रस्ताविक करत असताना नूतन प्राचार्य श्री.राहुल गदळे यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना कुठल्याही प्रकारची शिक्षणाच्या बाबतीत अडचण निर्माण होणार नाही याची ग्वाही दिली. तदनंतर डॉ.नेहरकर, डॉ. शशिकांत दहिफळकर संजय केदार, भगवान केदार, सुमंत धस,व
प्रमुख पाहुणे श्री नंदकिशोरजी मुंदडा आपले मनोगत व्यक्त केले. श्री नंदकिशोरजी मुंदडा यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सेवानिवृत्त शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहवास खूप मोठा असतो या सहवासातून शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. आपण प्रदीर्घ काळामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे त्या काळामध्ये आपण आपल्या परिवाराकडे लक्ष कमी देऊन या विद्यार्थ्यांना ज्ञान करण्याचे खूप मोठे काम आपण केले आहे. शिक्षकांचं काम जसं कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांना आकार देण्याचे किंवा घडवण्याचं काम काम करत असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कै.शाम दादा गदळे, श्री सखाहरी तात्या गदळे, व श्री विक्रम बप्पा मुंडे यांनी शिक्षण संस्था काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचं खूप मोठं काम करत आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कुठल्याही परिस्थितीशी तोंड देण्याचे धैर्य ठेवले पाहिजे तसेच आधुनिक काळात मोबाईलचा गैरवापर करू नका . विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तरच त्यांचे जीवन यशमय जाईल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले व सेवानिवृत्त श्री मोराळे आर.एस. व श्री गदळे बी.टी.यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व नूतन प्राचार्य राहुल गदळे यांनाही पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सखाहारी तात्या गदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सर्व शिक्षकांनी व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना इमानदारीने शिक्षण देण्याचे काम करावे. जेणेकरून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे.अशा प्रकारच्या सर्व शिक्षक व प्राध्यापकांना सूचनाही केल्या. सेवानिवृत्त श्री मोराळे आर. एस. व श्री.बी.टी. गदळे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री डॉ. वसुदेव नेहरकर, मा. श्री सुमंत धस, माननीय श्री. डॉ. शशिकांत दहिफळकर,मा.श्री .वसंतभाऊ केदार,. मा.श्री.भगवान केदार मा.श्री.शिवाजी पाटील,मा.श्री .संजय केदार,मा.श्री.अविनाश गाताडे ,मा.श्री.मा.श्री.सचिन सिरसट,सूरेश कोठावळे,मा.श्री.
आश्रूबा भांगे,पत्रकार रमेश ईतापे व पालक, पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .डॉ.जावेद शेख यांनी केले तर आभार मोरे यांनी मानले.