प्रामाणिकपणा! रस्त्यात सापडलेला मोबाईल दिला परत
हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने शेतकऱ्याला आनंद

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/ सामाजिक
केज/ प्रतिनिधी
केज / एकदा कोणतीही वस्तू हरवल्यानंतर ती वस्तू कोणा व्यक्तीला सापडल्यास ते स्वतः कडे ठेवून घेण्याचा कल सध्या वाढलेला आहे.परंतु समाजात अजूनही प्रमाणिकपणा शिल्लक असल्याचे एका घटनेवरून दिसून येत आहे. अशीच घटना केज तालुक्यातील माळेगाव येथे सोमवारी(दि१)घडली. महादेव विठ्ठल डीकले (रा सोनेसांगवी) हे माळेगाव ते कळंब प्रवासादरम्यान मोबाईल हरवला.त्यावेळी
जवळबन चे उपसरपंच धनराज करपे हे कळंबहुन गावाकडे दुचाकीवरून येत असताना रोडच्या कडेला मोबाईल पडलेला दिसला त्याच वेळी गाडी उभा करून तो मोबाईल जवळ घेऊन ठेवला आणि माळेगाव येथे थांबले.
दरम्यान पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हरवल्यामुळे व्यवसायाने शेतकरी असलेले महादेव डिकले हे मोबाईल सापडेल की नाही या चिंतेत होते.त्यानंतर त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या नंबर वर फोन लावला असता पुढून धनराज करपे यांनी प्रामाणिकणा दाखवत फोन उचलून ‘मला तुमचा मोबाईल रस्त्यावर सापडला आहे तुम्ही माळेगाव येथून घेऊन जावा’ असे असे सांगितले. त्यानंतर येथील एका हॉटेलमध्ये उपसरपंच धनराज करपे यांनी मोबाईलचे मूळ मालक महादेव ढिकले यांच्याकडे मोबाईल सुपूर्द केला. यावेळी पत्रकार गोविंद शिनगारे, पत्रकार बळीराम लोकरे, दत्ता गव्हाणे हे उपस्थित होते. शेतकरी महादेव ढिकले यांनी आपला मोबाईल परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आभार मानले. तर धनराज करपे यांच्या प्रमाणिकतेबद्दल कौतुक होत आहे.