सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.जावेद शेख यांच्या भाचीचे SSC बोर्ड दहावी परिक्षेत १०० टक्के गुण मिळवत घवघवीत यश
विद्याभवन हायस्कूल कळंबची विद्यार्थ्यांनी कु.रामपुरे अलसबा हिने 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 100 टक्के गुण घेत धाराशिव जिल्ह्यातून प्रथम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शैक्षणिक विश्व यशोगाथा
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विशेष न्युज
राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत कळंब गावची रहीवाशी विद्याभवन हायस्कूल कळंबची विद्यार्थिनी व सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख यांची भाची कु. रामपुरे अलसबा रईस हिने आपल्या अभ्यासातील अथक परिश्रमातून शैक्षणिक वर्ष 2023- 2024 या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वी शालांत परीक्षेत अतिशय जिद्दीने यशाला गवसणी घातली असुन 100 टक्के गुण घेत दहावी बोर्डाच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. कु.रामपुरे अलसबा रईस ही सुरुवाती पासूनच अतिशय हुशार , होतकरू विद्यार्थीनी आहे. तिने शालेय स्तरावर अनेक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. जिद्द मेहनत, चिकाटी च्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्यपूर्ण अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेले गुण पुढील प्रमाणे मराठी 89 संस्कृत 100 इंग्रजी 97गणित 98 विज्ञान 99 सामाजिक शास्त्र 100 गुण मिळवले आहेत, एकूण 500 गुणा पैकी तिला 494+ 06 एकूण 100% गुण मिळवलेले आहेत. तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.व तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने
हार्दिक अभिनंदन …!!