अखिल भारतीय गांधर्व परिक्षेत श्री गजानन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शाळेचे संगीत शिक्षक श्री मेघराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळवले नेत्रदीपक यश

वैभवशाली महाराष्ट्र डिजिटल न्यूज
शैक्षणिक विश्व विशेष गुणवंत
केज प्रतिनिधी .
केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथील श्री गजानन गुरुकुल येथे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत प्रारंभीक परिक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले असुन या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कृष्णप्रिया देशमुख , सृष्टी अंबाड ,नेहाली बिडवे , अन्वीशा महाजन, गौरवी देशमुख, स्वराली जाधव , श्रावणी कापसे , रुद्राणी कापसे , सागर अंबाड , यांचा समावेश असुन सदरील विद्यार्थ्यांनी संगीत परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर महाजन , शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र अंबाड व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई येथील परिक्षेत यश संपादन केले आसे संगीत शिक्षक श्री मेघराज कदम व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी गुणवत्तांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून यावर्षीपासून केज तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व विधवा परित्यक्तांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले .या योजनेअंतर्गत गरजु विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असुन आपल्या ग्रामीण भागातील गरीब , शेतकरी, कष्टकरी यांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प श्री गजानन गुरुकुलचे अध्यक्षांनी आपल्या मनोगतप्रसंगी विचार व्यक्त केले व सर्वांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या प्रांगणात यशस्वीपणे संपन्न झाला.