काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये बालविवाह निर्मुलन जनजागृती कार्यक्रम संपन्न
शैक्षणिक विशेष / बातमी संकलन डॉ जावेद शेख

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
युनिसेफ,एसबीसी-३, जिल्हा प्रशासन व मनस्वीनी महिला विकास सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मीपूजनाने करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून कुलकर्णी कल्पना प्रदिप यांनी शाळेतील मुलांना व मुलींना वेगवेगळ्या खेळातून ,गीतातून, गोष्टीतून बालविवाहाचे महत्त्व समजून सांगितले तसेच मूलांनी वयाच्या 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व मूलींनी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न करावे.असे आपल्या आई वडिलांना ही सांगा व कोठे आपणास बालविवाह होताना दिसून आल्यास आपण तात्काळ 10 98 नंबर वर संपर्क करून तो बालविवाह थांबवावा अशा प्रकारचे मार्गदर्शन केले यावेळी काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राहुल गदळे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हटले की, बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट करण्यासाठी शाळेतील मुलां मुलींनी समोर आली पाहिजे जेणेकरून समाजात बालविवाह होताना दिसून येणार नाही. मुलींनी आपल्या स्वतःच्या पायावर उभारल्याशिवाय किंवा स्वतः सक्षम झाल्याशिवाय लग्न करू नये. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मोराळे सर यांनी केले तर यांनी डॉ.शेख यांनी आभार मानले.या वेळी शाळेची पर्यवेक्षक श्री घुले सर ,ज्येष्ठ शिक्षक भांगे सर, गीते सर, प्रा. ढाकणे सर , घुले सर, गायकवाड सर तांबडे सर शिक्षकेतर श्री नितीन कोठावळे सर , अशोक कोठावळे, सुनील पवार व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.