सम्राट अशोक मा. विद्यालय गोटेगाव शाळेच्या वतीने आषाढीवारी निमित्त बालदिंडी सोहळा यशस्वी संपन्न
विद्यार्थ्यांच्या मनमोहक वारकरी वेशभूषेने वेधले सर्वांचे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
(केज ता. प्रतिनिधी)
केज ता.गोटेगाव येथील सम्राट अशोक माध्यमिक विद्यालयाच्या व जि.प. प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची आषाढी वारीचे औचित्य साधून भव्य दिव्य आषाढीवारीची भव्य दिव्य विद्यार्थी बालदिंडीचे आयोजन करण्यात आले आसता यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री पांडुरंगाच्या व रुक्मिणी मातेच्या रुपात वेशभूषा तर अनेक विद्यार्थी मुलं मुली विविध वारकऱ्यांच्या वेशभूषेत बालदिंडीत सहभागी झाल्याने मौजे गोटेगाव नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते तर यावेळी टाळ मृदंग भगवी पताका तुळशी वृंदावन मुलांनी वारकऱ्यांचे पोशाख तर मुलींनी महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारी वेशभूषा करून दिंडी सोहळ्याला विशेष स्वरूप प्राप्त करून दिले होते . सकाळी १० वा. दिंडीला शाळेच्या प्रांगणातुन हरीनामाच्या गजरात सुरुवात झाली व त्यांनंतर गावातील मुख्य रस्त्यावरून गावात असलेल्या मुख्य मंदिराच्या परिसरात बालदिंडीचे आगमन होऊन याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांचे वारकरी रिंगण करुन यात हारीनामाच्या गजरात पाऊले खेळण्याचा आनंद सर्वांनी घेतला व शालेय विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या फुगड्यांनी उपस्थित आबालवृद्धांची मने जिंकली आणि नंतर बालदिंडीचे प्रस्थान परत शाळेच्या आवारात परत होऊन दिंडीचा समारोप संपन्न झाला . यावेळी शाळेच्या सर्व पालाकांचेही विशेष सहकार्य लाभले व
सदरील सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साखरे मॅडम , जेष्ठ शिक्षक श्री सावंत सर , श्रीमती गायकवाड मॅडम , श्री . खरबड सर , श्री पवार सर , श्री . केदार सर , श्री .देशमुखे सर , श्री कदम सर , श्रीमती चौधरी मॅडम , श्री. बचुटे, श्री निरडे यांनी परिश्रम घेतले व यांच्या यशस्वी नियोजनातुन सोहळा संपन्न झाला