अफार्म पुणे , संस्कृती सेवाभावी संस्था केज यांच्या संयुक्त विद्यमाने मानेवडी येथे हवामानानुकूल-अल्पखर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसार अभियानांतर्गत शेतकरी मेळावा उत्साहात साजरा
सामाजिक , कृषी विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज ता .प्रतिनिधी
केज दि.23/7/2024 रोजी केज तालुक्यातील मौजे मानेवाडी या गावी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आसता यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. संजय कुलकर्णी, मा श्री सरपंच पवन माने. प्रगतशील सेंद्रिय शेतकरी बालासाहेब धायगुडे इ. मान्यवर उपस्थित होते. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहणे अध्यक्ष व इतर मान्यवरांचे स्वागत समारंभ यावेळी करण्यात आला.
प्रस्तावना व कार्यक्रमाचा हेतू :
संस्कृती सेवाभावी संस्था ही संस्था गेल्या 1० वर्षापासून समाजात महिला सक्षमीकरण उद्योग व्यवसाय, शेती,पाणी, , महिलांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न या विषयाव काम करत आहे. आज रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचे व व्यक्तीचे नुकसान होत चालले आहे हे थांबविण्यासाठी आम्ही अफार्म – पुणे आयोजित हवामानकुलीत- अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी अभियान अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून तो मार्केट मध्ये वेगळ्या भावाने विकणे व आपल्या शेतमाला मार्केट तयार करणे अर्थातच शेतीत कमी खर्च करून जास्तीत जास्त कसे उत्पन काढता येईल व ही पद्धत दीर्घकाळ कशी टिकवता येईल करिता ह्या हवामानकुलीत- अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी अभियान अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्याकार्माअंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले
या आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या सचिव विजया कांबळे यांनी सेंद्रिय शेती व अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान शेतीत कसे वापरायचे व कमी खर्चात शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढायचे यावर आपल्या शेतीतील काही उदाहरणे देऊन जमलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
बाजारातील शेत मालाची काय मागणी आहे, कोणत्या भाजीपाल्याला बाजारत सद्य भाव काय आहे, आपण कोणत्या भाज्या शेतात पिकवून जास्त प्रमाणत विकू शकतो, शेतात कमी पाण्याची पिके कशी घ्यायची, लागवड कशी करायची, सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला करावा .
बदलत्या वातावरण व बाजारातील बदलते भाव यावर आपण शेतीत कोणते उत्पन्न घ्यावे . रासायनिक खताचा कमी वापर कसा करावा व सेंद्रिय खताचा व गांडूळ खताचा वापर जास्तीत जास्त वापर करावा. थोडक्यात कमी खर्चात जास्त उत्पन्न कशे काढावे .माती परीक्षण बीज प्रक्रिया , काम्पोस्त खात, दशपर्णी अर्क , लमित अर्क, पिक नियोजन व वाणाचा प्रकार व कीड नियंत्रण कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन केले पुरतान काळातील शेती आणि आधुनिक काळातील शेती यामधील फरक समजून सांगून आपण आपल्या शेतीला मोडूल शेती कशी करावी. आपली शेती दुसऱ्याने पाहायला यावी अशा पद्धतीने शेती करावी असे यावेळी सांगितले.
मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या शेतातील मातीचे माती परीक्षण करून आपल्या शेतातील मातीच्या नमुन्यात भौतिक, रासायनिक व जैविक घटक पहावेत
आपल्याला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास पिक लागवड कशी असावी व आपण कोणत्या पद्धतीचे पिक लागवड केली पाहिजे
सर्व शेतकऱ्यांना संघटीत होऊन आपले काम करावे. शेतकरी ग्रुप स्थापन करून आपल्या
आय सीआय सीआय फाउंडेशनचे संजय कुलकर्णी सर यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला आर्थिक साक्षरता यावर बचत व नियोजन गुंतवणूक कशी व कोठे करायची यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी गावचे सरपंच पवन माने यांनी सेंद्रिय शेतीसाठी आम्ही सर्व तयार आहोत व गावातील शेतकरी सेंद्रिय शेती करतील असे सांगितले. गावातील कर्तुत्वान महिला म्हणून अंगणवाडी ताई छाया धायगुडे यांचा संस्थेने अहिल्याबाई होळकर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला तसेच जलमित्र म्हणून संस्थेने त्यांची निवड केली. उपस्थित सर्व शेतकरी यांना पोषक परसबाग बियांचे वाटप करून सेंद्रिय शेती पुस्तिका देण्यात आल्या. सर्व शेतकरी वर्गाचे व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.