जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आवसगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत 1000 वह्या व रजिस्टरचे वाटप
आवसगावचे भुमिपुत्र व पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांच्या माध्यमातून हिंदुस्थान फूडस बारामतीचे प्रतिनिधी शिवाजी देवकर यांनी केले वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
सामाजिक/ शैक्षणिक विशेष
केज प्रतिनिधी
दिनांक – 26 जुलै 2024 रोजी पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक श्री संतोष शिनगारे तसेच हिंदुस्तान फिडस बारामती यांचे प्रतिनिधी शिवाजी देवकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व रजिस्टर यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना संतोष शिनगारे यांनी मुलांनी शिक्षणासॊबतच शेती, माती, पाणी याचा अभ्यास करून आपल्या आई-वडीलाना शेती कामात मदत करावी असे ही अहवान केले. आवसगावच्या मातीत खूप चांगला गुणधर्म आहे या शाळेत शिकून कलेक्टर,डॉक्टर, इंजिनियर, व्यवसायिक,सामाजिक कार्यकर्ते, चांगले शेतकरी असे अनेक हिरे या जिल्हापरिषद शाळेने घडवले आहेत
चांगल्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पडलेले सर्व प्रश्न शिक्षकांना विचारून त्याच उत्तर घेतले पाहिजे असे ही बोलताना ते म्हणाले.
शिवाजी देवकर यांनी हिंदुस्थान फिड्स कंपनी बद्दल माहिती देऊन कंपनीच्या कामाबद्दल माहिती दिली व जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे जनावराचे खाद्य फीड वापरून दूध वाढवावे असे सांगितले.
यावेळी 187 विद्यार्थ्यांना 1000 वह्या व रजिस्टर चे मोफत वाटप कंपनी मार्फत करण्यात येत आहे असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.गव्हाणे सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. हंडीबाग सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.