बीड जिल्ह्याचे आदर्श व्यक्तिमत्व हिरालाल कराड यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न.
शिक्षण क्षेत्रात हिरालाल कराड यांचे मोठे योगदान- राजेसाहेब देशमुख

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडीया
शैक्षणिक विश्व
वैभवशाली /प्रतिनिधी (डॉ जावेद शेख)
शिक्षण क्षेत्रात हिरालाल कराड यांचे फार मोठे योगदान आहे. शांत, संयमी, विद्यार्थी प्रिय व शिक्षक प्रिय असे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले कार्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून सर्व परिचित असणारे हिरालाल यांचा बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात आवर्जून नाव घेतले जात आहे. असे प्रतिपादन माजी शिक्षण सभापती तथा बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.
ज्येष्ठ शिक्षण अधिकारी तथा
माजी उपशिक्षण अधिकारी हिरालाल कराड सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव सिरसाट हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख म्हणाले, हिरालाल कराड हे हिऱ्यासारखे आहेत. सभापती असतांना उत्कृष्ट पद्धतीचे काम केले आहे असे प्रतिपादन केले. तर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कुटुंबात तसेच शिक्षणाचे धडे देत असताना देखील विद्यार्थ्याला आपलेसे करून घेण्याची कला त्यांच्या अंगी होती. 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये नऊ वर्ष सहशिक्षक म्हणून शाम विद्यालय दहिफळ (वडमाऊली )येथे आपली सेवा दिली. तदनंतर पंचवीस वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा समन्वयक (सर्व शिक्षा अभियान), जिल्हा समन्वयक (समग्र शिक्षा ) अधीक्षक वर्ग- २ (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी(प्राथमिक), , म्हणून आपल्या या कालावधीत विना तक्रार पार पाडली. शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. वृक्ष संवर्धन व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सतत धडाडीने भाग घेण्याचे काम कराड यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात अंबाजोगाई कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आदीची भाषणे झाली. अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, महिला आयोगाच्या सदस्या डॉ. शालिनी कराड, प्राचार्य सोमनाथ बडे, केज पं.स. चे माजी उपसभापती भगवानराव केदार, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे धारूरचे अर्जुन तिडके, ईश्वर मुंडे, माजी शिक्षणाधिकारी डी. टी. सोनवणे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, गणेश गिरी, अधीक्षक रंगनाथ राऊत, ज्येष्ठ शिक्षण अधिकारी शिवाजी अंडील, भगवानराव सोनवणे, तुकाराम पवार, डॉ. शशिकांत दहिफळकर,आदीची याप्रसंगी उपस्थिती होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी कमलाकर खरात, विस्तार अधिकारी दत्ता चाटे, सुनील केंद्रे, श्रीधर शेळके, गणेश गिरी, लक्ष्मण बेडस्कर, एम. के.पठाण, आदींनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, साधन व्यक्ती, यांनी विशेष परिश्रम घेतले.