आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

सेवासदनचा ६ वर्धापन दिन २२ जून रोजी संपन्न होणार :..धनराज कदम

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि IRS ऑफिसर समीर वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती

समृद्ध महाराष्ट्राच्या ..सर्वांगीण बातम्यांसाठी .

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

हिंगोली जिल्हा विशेष

हिंगोली येथे मागील सहा वर्षापासून सेवासदन मुलांचे वसतिगृह चालवले जाते. धनराज कदम व मीरा कदम हे वस्तीगृह चालवतात. अनाथ निराधार कुटुंबातील मुलांसाठी हे वस्तीगृह चालवले जाते. या वसतिगृहात 70 मुले शिक्षण घेत आहेत.

आजपर्यंत या वसतिगृहातील मुले मेडिकल ,इंजीनियरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग ,सीए, महाराष्ट्र पोलीस इत्यादी क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. स्वतःच्या मुलाप्रमाणे धनराज कदम व मीरा कदम या मुलांचा सांभाळ करतात. सेवासदन वस्तीगृहाचा सहावा वर्धापन दिन 22 जून 2025 रोजी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मराठवाडा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर ,IRS ऑफिसर समीर वानखेडे , हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर , लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तसेच विविध क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि सेवासदन परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.      या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे साथ फाउंडेशन तांदूळजा यांच्याद्वारे समाजाप्रती निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ह .भ .प. पुरुषोत्तम महाराज, अनेक गोरगरीब मुलांना अतिशय माफक दरामध्ये स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्रा. विठ्ठल कांगणे , मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत राज्यात पहिली आलेली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा जिल्हा वाशिम, विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजसेवेसाठी एकत्र येऊन स्थापन केलेला आपुलकी परिवार नांदेड यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर ज्या तरुणांनी अगदी शून्यातून व्यवसाय उभा करत सामाजिक बांधिलकी जपली अशा तरुणांचा युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये IRS ऑफिसर समीर वानखेडे व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साथ फाउंडेशनचे अध्यक्ष व सेवासदन वसतीगृहाचे संचालक धनराज कदम यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.