माणसे जोडणाऱ्या अंबाजोगाईकरांना सुनिलकाकांचा कधीच विसर पडणार नाही – राजेसाहेब देशमुख
जयंतीनिमित्त स्वाराती रूग्णालयात फळवाटप

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाईकरांचे आवडते व्यक्तीमत्व सुनिलकाका लोमटे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त रविवार, दिनांक १४ जानेवारी रोजी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ ते ५ या ठिकाणी रूग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माणसे जोडणाऱ्या, कायम जनसेवेसाठी उपलब्ध असलेल्या सुनिलकाकांचा विसर अंबाजोगाईकरांना कधीच पडणार नाही असे राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ ते ५ या ठिकाणी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दिग्विजय भास्करराव लोमटे, हरीशभाऊ वाघमारे आणि शाहीर मामा काळे यांच्या हस्ते रूग्णांना फळ आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, दिलीपराव काळे, शेख मुख्तार बागवान, समद कुरेशी, समीर शेख यांच्यासह रूग्णालयातील डॉक्टर, सिस्टर व स्टाफ उपस्थित होता.
*अंबाजोगाईकरांना सुनिलकाकांचा विसर कधीच पडणार नाही – राजेसाहेब देशमुख :*
दिनांक १४ जानेवारी हा अंबाजोगाईकरांचे आवडते व्यक्तीमत्व सुनिलकाका लोमटे यांचा वाढदिवस. पण, हा वाढदिवस जयंती म्हणून साजरी करताना मनाला प्रचंड वेदना होत आहेत. आपल्या अल्पायुष्यातच असंख्य लोकांना जोडणारा नेता म्हणजे सुनिलकाका होय. काकांनी अंबाजोगाई शहरातील प्रत्येक माणसाच्या मनात आपलं घर केलं आहे. कायम जनतेसाठी उपलब्ध असलेले युवा नेतृत्व म्हणजे काका होते. प्रत्येक माणसाला आपुलकीने व मायेने बोलून आस्थेवाईकपणे चौकशी करणारे लोकनेतृत्व म्हणजे सुनिलकाका हे होते. काका हा प्रत्येकाला आपला वाटणारा आपला हक्काचा माणूस आज आपल्यात नाही हे मानायला मन अजुन ही तयार नाही. काका जरी देहरूपाने आज आपल्यात नसले तरी ते कार्यरूपाने, आठवणीने आपल्या कायम सोबत आहेत. काकांनी अल्पायुष्यात असंख्य माणसे जोडली. त्यामुळे अंबाजोगाईकरांना सुनिलकाकांचा विसर कधीच पडणार नाही असे भावोद्गार राजेसाहेब देशमुख यांनी काढले.