बोरीसावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभे निमित्त जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न
केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे होणार मराठा आरक्षण महासभा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगिण बातम्यांसाठी..
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज तालुका प्रतिनिधी
केज;प्रतीनीधी दि 29 रोजी सकाळी साडे आकरा वाजता तालुक्यातील बोरीसावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणा निमित्त महासभेचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले असून त्या अनुषंगाने त्या निमित्त बोरी सावरगाव ते बनसारोळा रस्त्यालगत 100 एकर जागेचे नियोजन करण्यात आले त्या जागेचे शेतात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्यानिमित्त त्यांचे उपस्थित सकल मराठा समाज बांधवाकडुन कौतुक होत आहे तरी या सभेचे आयोजनानिमित्त भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला या साठी
केज तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या सभेसाठी महिलांची वेगळी सोय अलग करण्यात आली असून या सभेला तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजितांनी केले आहे या कार्यक्रमासाठी केज तालुक्यातील प्रत्येक गावातील सकल मराठा बांधवांनी मतभेद विसरून सर्व सकल मराठा समाज प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
चौकट:-मनोज जरांगे पाटील यांची सभा आमच्या शेतात घेने हे आम्हि आमचे भाग्य समजतो ,त्यांच्या पदस्पर्शाने आमची जमीन पावन झाली, तालुक्यातील सर्व जनतेने या सभेसाठी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे
हणुमंत मुळे,चंद्रकांत मुळे,धनराज मुळे,