आपला जिल्हासामाजिक

अंबाजोगाईत संत शिरोमणी सेना महाराजांच्या विचारांचा जागर – राजकिशोर मोदी

अंबाजोगाईत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई प्रतिनिधी

श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या ६२५ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री.संत सेना महाराज प्रतिष्ठाण आणि नाभिक समाज, अंबाजोगाई यांनी पुढाकार घेतला होता.

 

शहरातील श्री संत सेना महाराज व श्री संत नरहरी महाराज मंदिर, मुकुंदराज रोड, अंबाजोगाई येथे शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीहरी गवळी, माणिकराव राऊत, विष्णु कचरे आणि पांडुरंग कचरे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड (श्री.जगद्‌गुरू तुकोबाराय पावनधाम, औरंगपुर) यांची किर्तन सेवा संपन्न झाली. तर दुपारी १२ ते २ या वेळेत प्रसिद्ध गायक सुभाष शेप व गायक रफिक भाईजान, मयुरी यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते किर्तन व भजनाचे मानकरी विठ्ठल शिंदे, महाप्रसादासाठी योगदान देणारे माणिकराव राऊत यांचा तसेच विविध प्रसंगी समाजोपयोगी उपक्रमास सहकार्य करणारे अजिंक्य राऊत, श्रीहरी गवळी, विष्णू कचरे, पांडुरंग कचरे, भिमराव कचरे यांचा ही कृतज्ञताभाव व्यक्त करीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख अतिथी राजकिशोर मोदी, सोनार समाजाचे अध्यक्ष राजेश पंडित यांचे नाभिक एकता महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा संत सेना महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर सुरवसे, नाभिक एकता कर्मचारी महासंघ तालुकाध्यक्ष डॉ.केशव राऊत, माणिकराव हरणे, अनंत मोहिते, विष्णू कचरे व इतरांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, दरवर्षी हा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण समाज एकत्र येतो. या ठिकाणी आपण सर्वजण भक्तीपर भजन, कीर्तनाच्या माध्यमातून श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम करतो. या माध्यमातून नाभिक एकता महासंघाचे तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे व त्यांचे सहकारी हे नाभिक समाज संघटन करण्याचे कौतुकास्पद कार्य करीत आहेत. त्यामुळे श्री संत शिरोमणी सेना महाराजांचे विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविले जात आहेत. हे अभिनंदनिय आहे. म्हणून अशा अध्यात्मिक, धार्मिक उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. अंबाजोगाईत खऱ्या अर्थाने संत शिरोमणी सेना महाराजांच्या विचारांचा जागर सुरू असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मोदी यांनी केले. यावेळी नाभिक एकता कर्मचारी महासंघाचे शहराध्यक्ष रघुनाथ राऊत, नाभिक एकता महासंघ शहराध्यक्ष अजिंक्य राऊत, एकता नाभिक महासंघ महिला आघाडीच्या पुष्पाताई कचरे, राजेभाऊ जाधव, श्रीरंग सुरवसे, डॉ.कमलाकर राऊत, विठ्ठल मोटेगावकर, केशव राऊत, दादा चोपडे, माऊली चोपडे, विलास काळे, लक्ष्मण राऊत, सावंत सर, बालाजी कचरे, अशोक शिंदे, अमोल माने, विष्णू कचरे, पांडुरंग कचरे, महादेव कांबळे, माणिक राऊत, ओम गवळी, श्रीकांत घोडके, भाऊसाहेब गवळी, सचिन शिंदे, श्रीहरी गवळी, अमित चव्हाण, जीवन गवळी, नाथराव गवळी, बाळू कोथळे, प्रवीण सुरवसे, विजय गवळी, नवनाथ सुरवसे, दत्ता काळे, बालाजी कांबळे, महेश कचरे, वैभव राऊत, डी.के.कचरे, सुरज कचरे, आर.के.कचरे, जगन्नाथ बिडवे, हनुमंत वाघमारे, अभिषेक सुरवसे, नितीन गवळी, योगेश गायकवाड, लिंबराज गवळी, योगेश काळे, श्रीनिवास कचरे, गणेश राऊत, संतोष कचरे, उमेश दळवी, भागवत राऊत, अमृत मोटेगावकर, दादासाहेब सावंत, दिगंबर माने, चंद्रकांत सुरवसे, रवी लोखंडे, बाबुराव घोडके, पुरूषोत्तम कचरे, विनायक गायकवाड, बालाजी गायकवाड, ऋषिकेश मोरे, संभाजी राऊत, रवी काळे, ओम सावंत, दत्ता गोरे, सुभाष राऊत, शुभम कचरे, दिलीप सुर्यवंशी, मोहन सुर्यवंशी, पिंटू सुरवसे, गणेश काशिंदे, दिलीप कांबळे, बाबुराव कांबळे, बालाजी वाघमारे, राम राऊत, बालाजी हरणे, कविराज कचरे, दिपक सुरवसे, दिलीप माने, कल्याण कांबळे, किर्तन गवळी आदींसह समाज बांधव, महिला भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तालुकाध्यक्ष मधुकर सुरवसे यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ.केशव राऊत यांनी करून उपस्थितांचे आभार अनंत मोहिते यांनी मानले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.