सहयाद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार अशोक मोरे यांची निवड जाहीर
लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील निवड होणार - प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड /प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री मराठी पत्रकार संघ स्थापन करण्यात आला आहे .पुणे जिह्यात सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार अशोक मधुकर मोरे यांची निवड करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष डॉ.जावेद शेख यांनी दिले आहे.पुणे जिल्ह्यतील पत्रकारासाठी बांधवाच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार सक्षमीकरण साठी प्रयत्न केले जाणार आहेत.पत्रकार कुटुंबियांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त पत्रकार सभासद संघटनेला जोडले जाणार आहेत.
पत्रकार अशोक मोरे यांचा अनुभव खूप मोठा आहे त्यामूळे अशोक मोरे यांना सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.पत्रकार अशोक मोरे यांनी जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्यामुळे अध्यक्ष श्री गोविंद (नाना ) शिनगारे प्रदेशाध्यक्ष डॉ. जावेद शेख यांचे आभार मानले. या निवडीनंतर पत्रकार मधुकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पुढील कार्यास सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.