विनोद शिंदे यांची सह्याद्री पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
दैनिक सुर्योदय परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांचा करण्यात आला सन्मान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड आरोळी वार्ताचे संपादक विनोद शिंदे यांची सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल दैनिक सूर्योदय परिवार यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. किरण तुपे सर, काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व संभाजी जाधव, सूर्योदयाचे उपसंपादक प्रवीण वडवारे, पत्रकार लक्ष्मण गायकवाड यावेळी आदी उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद शिंदे यांनी सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकारांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल दैनिक सुर्योदय परिवाराच्या वतीने आपण माझा यथोचित सन्मान करुन संघटनेचे माध्यमातून मला जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी तसेच सवैधानिक काम करण्यासाठी जबाबदारी वाढली याचे नक्कीच पुढील काळात चांगले काम करुन आपल्या सत्काराचे ऋण आसेल आसे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.