शेतकऱ्यांना सन २०२२ व २०२३ चा पीक विमा तसेच सोयाबीन व कापूस पिकाला हमी भाव द्या – माजी आमदार पृथ्वीराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निवेदनातून आंदोलनाचा इशारा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
कृषी विशेष न्युज मिडिया
अंबाजोगाई प्रतिनिधी
शेतकऱ्यांना सन २०२२ व सन २०२३ चा पीक विमा तात्काळ द्या तसेच सोयाबीनला १० हजार रूपये व कापसाला १५ हजार रूपये हमी भाव द्यावा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उपजिल्हाधिकारी यांना बुधवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडलेला आहे. गेल्या २-३ वर्षांपासून शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेले पिक गेल्यामुळे शेतकरी खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत सन २०२२ व सन २०२३ चा पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. ३१ ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होईल असे आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिले होते. परंतु, ३० सप्टेंबर सुद्धा संपून गेला तरी अद्यापही पिक विमा मिळालेला नाही. तसेच सोयाबीन व कापूस या पिकांना हमी भाव नसल्यामुळे काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकांबद्दल शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. तरी सन २०२२ व सन २०२३ चा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा तसेच सोयाबीनला १० हजार रूपये व कापूस या पिकाला १५ हजार रूपये हमी भाव देण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदन देताना माजी आमदार पृथ्वीराज साठे, तारेख अली उस्मानी, तानबा लांडगे, ऍड.शहाजहान खान पठाण, गोविंद टेकाळे, अंकुश ढोबळे, हमीद चौधरी, राहुल सिरसट, शेख मुनव्वर, आश्रुबा करडे, हाजी अब्दुल खालेक कुरेशी, रविंद्र मोरे, चंद्रकला देशमुख, खतीब ताई, शेख बुऱ्हानोद्दीन, यश अलझेंडे, दिनेश साठे, सुधाकर जोगदंड, रामराव आडे, जुम्मा चौधरी, राजाभाऊ शिंदे, निखिल रणदिवे, जय गवळे, शेख इम्रान, सुरज भालेराव, शंकर साठे, आदित्य कांबळे, इम्रान पठाण, शेख समद शेख महम्मद, रमेश कदम, रमजान गवळी, सय्यद भाई आदींसह इतरांची उपस्थिती होती.