अंबाजोगाईच्या दत्ता लांब यांनी पतंजलि हरिद्वार येथील योग शिबिरात साडेपाच मिनिटांत केली ८४ आसने
योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी केले कौतुक

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
माजी सैनिक दत्ता लांब यांनी नुकतेच पतंजलि हरिद्वार येथील योग शिबिरात केवळ साडेपाच मिनिटांत केली ८४ आसने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या योग शिबिराचे लाईव्ह प्रसारण जगभर करण्यात आले. मागील काही महिन्यांत तब्बल १११ नि:शुल्क शिबिरातून लांब यांनी हजारो विद्यार्थ्यांना योगाचे मोफत धडे दिले आहेत. भारतीय सैन्यात २१ वर्षे सेवा करून नि:शुल्क शिबिरातून योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या माजी सैनिक दत्ता लांब यांच्या कार्याची दखल घेऊन योगगुरू रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण व केंद्रीय प्रभारी, भारत स्वाभिमान यांनी कौतुक करून आशिर्वाद दिले.
माजी सैनिक योग प्रशिक्षक दत्ता सदाशिव लांब यांनी अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातून आयोजित करण्यात आलेल्या १११ शिबिरांतून योगाचे मोफत धडे देण्याचे अनमोल कार्य केले आहे. अंबाजोगाई येथील पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक, माजी सैनिक, आयुर्वेदिक चिकित्सक दत्ता लांब यांच्या योग दिंडी आपल्या दारी या अभियानाची नोंद व आपण केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची माहिती व प्राप्त विविध संस्थांची प्रशस्तीपत्र लांब यांनी पतंजलि योगपीठ हरिद्वार, भारत स्वाभिमान न्यास येथे जमा केली. लांब यांनी केवळ साडेपाच मिनिटांत केली ८४ आसने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पतंजलि योगपीठ हरिद्वार येथील शिबिराचे सुप्रसिद्ध आस्था चॅनेल वरून संपूर्ण जगभरात लाईव्ह प्रसारण करण्यात आले. याचा लाभ जगभरातील योग अभ्यासकांनी घेतला. माजी सैनिक लांब यांच्या कार्याची दखल घेऊन योगगुरू रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण व केंद्रीय प्रभारी, भारत स्वाभिमान यांनी कौतुक करून त्यांचा यथोचित सन्मान ही केला. लांब यांच्या निःशुल्क, निस्वार्थ योगसेवेचे उपस्थित सर्वांनीच स्वागत केले. लांब हे भारतीय सैन्यात फिजीकल शिक्षक म्हणून कार्यरत होते. म्हणून त्यांच्या अनुभवाचा आणि मौलिक मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांसह समाजासाठी लाभदायक ठरत आहे. दैनंदिन जीवनात योगाचे काय महत्त्व आहे. ते नि:शुल्क शिकविण्याचे काम लांब हे करीत आहेत. अंबाजोगाई शहर व तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांसाठी १५,८,५,३,२ व १ दिवसीय अशा एकूण १११ योग प्रशिक्षण शिबीरे घेवून यात तब्बल ६५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना दिनचर्या, आहार, योगिक डि.बिन्द्रिक, प्राणायाम, सर्व प्रकारचे आसन, योगनिद्रा, ध्यान यांचा अभ्यास व योगाचे धडे देण्याचे मौलिक काम माजी सैनिक लांब हे करीत आहेत. भारतीय सैन्य दलात असताना देखील लांब यांनी दरमहा आपली आर्धी पगार ही गोर-गरीबांसाठी खर्च केलेली आहे. सैन्यात देशसेवा करून निवृत्ती नंतर मागील १२ महिन्यांहून अधिक काळ ते आपली आर्धी पेंन्शन देखील सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करीत आहेत. ही खरच प्रेरणादायी व कौतुकास्पद बाब आहे. माजी सैनिक लांब हे योगाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरातील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांना निःशुल्क, मोफत योग सेवा देवून त्यांचे स्वास्थ निरोगी राहण्यासाठी ते आहोरात्र प्रयत्नशील आहेत. माजी सैनिक योग प्रशिक्षक लांब यांनी योग क्षेत्रात अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याचे नांव जगात उंचावले आहे.