चलो जलाये दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. दिपावली विशेष लेख मा . प्रसाद दादा चिक्क्षे ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई
दिपावली विशेष लेख. - 2024

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
दिपावली विशेष लेख – प्रसाद दादा चिक्क्षे
ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई
मी जेव्हा कधी जुनी कपडे घेऊन वस्तीवर जायचो न त्यावेळी मुलांचीच काय मोठ्यांची झुंबड उडायची. मोजून दोन ते तीन ते ही जुने कपडे वस्तीवरील मुलांच्याकडे असायचे.
कुणाच्या घरचे काही कार्यक्रमातील उरलेलं अन्न देण्यासाठी आले तर प्रचंड धावपळ करत ते मिळवण्याचा प्रयत्न करताना मी वस्तीवरील मुलांना पाहिलेलं आहे.त्यांच्यासाठी तो आनंदाचा दिवस असे.
दिवाळीच्या दिवशी मी कुणाच्याच घरी दिवा पेटवलेला पाहिला नाही. तेल खाण्यासाठीचे वांदे तर दिवा लावणे दूरच.रांगोळी एका दुसऱ्या घरात ते ही फक्त पांढरी. आजूबाजूला फटाके उडताना पाहताना मुलांना कुतूहल वाटे. मनसोक्त फटाके उडवणे दूरची गोष्ट.
यावर्षी नक्की केले की अंबाजोगाई मधील आपण काम करत असणाऱ्या वस्तीवर तरी मनसोक्त दिवाळी झाली पाहिजे. 55 मुलं, 40 घर माझ्या एकट्याने हे शक्य नव्हते. माझ्या मदतीला आली माझी बहिण आरती आणि भाऊजी मुकुंद त्यांच्या सोबतच प्रबोधक परिवारातील मुंबई, ठाणे,नवी मुंबई, कल्याण,डोंबिवली येथील बांधव. कल्पना गृह उद्योग च्या कल्पना लातूरकर. शिव-कुसुम प्रतिष्ठानचे अनिल कुलकर्णी
सर्व मुलांना नवीन कपडे घेतले प्रबोधक परिवाराने.अगदीच स्वतः निवडून आणि स्वतःला आवडणारी कपडे मुलांनी घेतले. सगळ्या कुटुंबांना भरपूर फराळ दिला कल्पना गृह उद्योग यांनी. रांगोळी,दिवे,तेल, फटाके यांची व्यवस्था केली शिव -कुसुम प्रतिष्ठानने. मनसोक्त फटाके उडवले. भरपूर रंगीत रांगोळ्या काढल्या. वस्त्यांवर शंभरावर दिवे लावले. सर्वांचा समन्वय साधला ज्ञान प्रबोधिनीने. काय बहारदार दिवाळी साजरी झाली !! प्रत्येक मुलगा आज झोपताना पुढील दिवाळीचे स्वप्न घेऊन नक्कीच झोपी जाईल !!