आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज
वसुंधरा विद्यालयास प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे यांची सदिच्छा भेट
शैक्षणिक

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शैक्षणिक विशेष
केज (प्रतिनिधी)
तालुक्यातील पैठण येथील वसुंधरा माध्यमिक व उच्च विद्यालयास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा.डॉ. वाल्मीक सरवदे यांनी शुक्रवार रोजी सदिच्छा भेट दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशील कुमार गायकवाड यांच्या हस्ते डॉ वाल्मीक सरवदे व वैशाली सरवदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
डॉ सरवदे यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रयत्नातून यश मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार श्री चौधरी यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.