येडेश्वरी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न
कृषी /उद्योग क्षेत्र विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
वैभवशाली महाराष्ट्र प्रतिनिधी
केज :- येडेश्वरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ बीड जिल्ह्याचे खासदार तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या शुभहस्ते आणि शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कमिटी सदस्य भाई मोहन गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिका सोनवणे व सोनवणे परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
रामेश्वर उबाळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सीमा रामेश्वर उबाळे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. बाळकृष्ण (बापु) भवर यांनी केले तर बाळासाहेब गलांडे, नारायण आबा शिंदे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते नवाब मामु, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बालासाहेब दादा बोराडे, व्हॉईस चेअरमन पिंटू ठोंबरे, दिलिप आबा गुलभिले, रमेश आबा शिंदे, न. प. केजचे गटनेते भाऊसाहेब गुंड, माजी सभापती अशोक तारळकर, नारायण शिंदे, विलास जोगदंड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. संजीवनीताई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, बंडू चौधरी, लाला वायबसे, शितल लांडगे, नर्गिस बागवान, बाळासाहेब गलांडे शरिफभाई सय्यद, राहुल खोडसे तसेच सभासद, शेतकरी, ठेकेदार, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————
” कारखान्याच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते शेतकरी आणि कामगार यांचे हित कारखाना होणार असून शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जास्त भाव देणार आहे. तसेच कामगार
वर्गांना समाधान कारक पगार दिला जाणार आहे.”
— खा. बजरंग सोनवणे
चेअरमन येडेश्र्वरी साखर कारखाना
———————————————
“कारखान्याच्या माध्यमातून खा. बजरंग सोनवणे यांनी शेतकरी आणि कामगार वर्गासह तरुणांच्या हाताला काम देवून त्यांचे कल्याण केले आहे.”
—- भाई मोहन गुंड,
शेकाप नेते