प्रजासत्ताक दिनानिमित्त सावळेश्वर येथे विविध क्षेत्रातील भुमिपुत्रांचा झाला सन्मान
महादेव दौंड यांचा सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल झाला गुणगौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज तालुका प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे सावळेश्वर (पै) येथे २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय सावळेश्वरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भुमिपुत्र गुणवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आसता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे सावळेश्वर गावचे जेष्ठ नागरिक श्री.बाबासाहेब करपे गुरुजी मा. जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच श्री मारुती कांबळे , उपसरपंच श्री अंकुश आबा करपे तर उपस्थिती म्हणून श्री मस्के महाराज , श्री मदन मस्के, डॉ शिवाजी मस्के , बालासाहेब डोंगरे , यांच्या हस्ते गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री रामकिशन मस्के सर , श्री अनिल मस्के सर , सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महादेव दौंड यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला तर गावातील गुणवंत विद्यार्थी चि.अभिषेक दत्ता डोंगरे (बीएमएस), चि.दत्ता व्यंकटी मस्के (बीएमएस) , कु. सुप्रिया सचिन मस्के (बीएमएस) यांचा प्रवेश मिळवल्याबदल तसेच कु. आकांक्षा डिंगाबर मस्के (b.farm) कु. अंजली चंद्रकांत मस्के (इंजिनिअरिंग) ,चि.रुतेश सुनील मस्के (navy eng.) या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रवेश मिळवल्याबदल व गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल मौजे सावळेश्वर (पै) ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने विशेष गुंतवंत म्हणून सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी मौजे सावळेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी सर्व संचालक , सदस्य व गावातील बहुतांश नागरिक विद्यार्थ्यांच्या उपस्थित सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला .