कै.वसंतराव नाईक आश्रमशाळेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई प्रतिनिधी
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार समोर ठेवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवार, दिनांक २८ ऑगस्ट रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्ज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत शाळेतील विद्यार्थीनी यांनी स्वागतपर गीताने केले. या तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन शासनाकडून कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजना सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोंचल्या पाहिजेत. या उद्देशाने या योजनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी करण्यात आले होते. या मेळाव्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठीच्या आश्रमशाळा, विद्यानिकेतन शाळा, गुणवंत मुला-मुलींसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, इतर मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना, मोदी आवास योजना, कन्यादान योजना, यशवंतराव चव्हाण वसाहत योजना, स्व.वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार, ऊसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठी निवासी आश्रमशाळा योजना, मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती योजना अशा विविध योजनांसंदर्भात निरीक्षक लक्ष्मण बारगजे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. ओबीसी महामंडळाचे कासाणे यांनी ही मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.ए.राठोड यांनी केले. यावेळी श्रीमती भवरे मॅडम, पडीले सर, ग्रामसेवक माचवे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. तर ए.आर.राठोड यांनी अध्यक्षीय समारोप केला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अनिलराव रामधन राठोड (सचिव, श्री.संत विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, परळी वै.), प्रमुख मार्गदर्शक लक्ष्मण बारगजे (निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बीड.), प्रमुख पाहुणे श्रीमती तपकीरे मॅडम (सहाय्यक प्रशासन अधिकारी, पं.स,अंबाजोगाई.), श्रीमती भवरे मॅडम (गृहपाल, शासकीय मुलींचे वसतीगृह), श्रीमती सुनंदा गर्जे (सरपंच, अंबलवाडी), भगवान हारे (सरपंच, जवळगाव), बालाजी हरिश्चंद्र पडीले (मुख्याध्यापक, आश्रमशाळा, साकुड), एस.आर.राठोड (मु.अ.प्रा.वि.), एस.ए.राठोड (मु.अ.माध्यमिक विभाग) आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश देशमुख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ए.एस.तांबोळी यांनी मानले. यावेळी विविध गावचे ग्रामसेवक, सरपंच, विविध योजनांचे लाभार्थी तसेच आश्रमशाळा साकुड व कै.वसंतराव नाईक आश्रमशाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, नागरिक, महिला, युवक उपस्थित होते.