धारूर तालुक्यात एकच चर्चा, लाल बावट्याचा ट्रॅक्टर मोर्चा
ट्रक्टर मोर्चाने वेधून घेतले प्रशासनाचे लक्ष .. शेतकऱ्यांचा विशेष सहभाग

धारूर प्रतिनिधी
धारूर तालुक्यात एकच चर्चा, लाल बावट्याचा ट्रॅक्टर मोर्चा…
संयुक्त किसान मोर्चा ने दिलेल्या ट्रॅक्टर मोर्चाच्या हाकेला तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला.किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी व ट्रॅक्टर सोबत विविध शेतकरी प्रश्नांना घेऊन थेट धारूर तालुक्याच्या तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला.
धारूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून थंडावलेली चळवळ पुन्हा नव्याने जोम धरून शेतकरी प्रश्नांवर लढा उभा करताना दिसतं आहे. त्यामध्ये सोशल मीडिया वरील ट्रेंड,धारूर तालुक्यात अतिवृष्टी अनुदान,पिकविमा या प्रश्नांवर लक्ष वेधून घेणारे मोर्चे व तालुक्याच्या ठिकाणी किसान सभेच्या नेतृत्वाखाली होताना दिसत आहेत.त्यातच आणखीन भर म्हणून बुधवारी झालेला शेकडो ट्रॅक्टरचा ताफा असेलेला ट्रॅक्टर मोर्चा.
स्वतःच्या खिशातील पैशाने मोर्चात सहभागी झालेल्या शेतकरी व ट्रॅक्टर मालक आणि मोर्चात विविध फलक लावून प्रश्नांनकडे लक्ष वेधन्यात आले. शेतकरीपुत्र्यांनी केंद्र सरकार व प्रशासनाच्या विरोधात आक्रमक घोषणाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला. शेकडो ट्रॅक्टर्स व हजारो शेतकरी असताना देखील मोर्चाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध असल्याने जनतेच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली.
तालुक्यातील गावागावात व गावातीलं पारावर झालेल्या मोर्च्याबद्दल व चळवळी बद्दल सकारात्मक चर्चा होत आहेत.कुठे तरी शेतकऱ्यांना वाली मिळाला अशी हाक शेतकरी चर्चेतून येताना दिसते आहे. आणि याचाच मोठा गंभीर परिणाम मात्र तालुका व जिल्ह्यातील प्रस्थापित धनदांडग्या, कारखानदार नेतृत्वान्ना धसका बसला आहे.
जर शेतकरीपुत्र स्वाभिमानाने स्वतःचे प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी स्वतः चं नेतृत्व करु लागले तर आमचं काय..?असा धास्तीचा,भीतीचा प्रश्न जिल्हाभरातील राजकारण्यांना पडतो आहे.
आम्ही किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काची आणि स्वाभिमानाची भाकर मिळवून देत आहोत.त्यामुळं कोणाच्या बुडाला आग लागत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.आम्ही आमचे काम करत राहू.किसान सभा लढत राहणार.
या मोर्चात निवेदन देऊन प्रशासनासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने पुढील प्रश्नावर चर्चा केली.
१.शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळवून देणारा कायदा करा.
२. स्वामीनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारशी लागू करा.
३. वीज विधेयक वापस घ्या.
4 घोषित अतिवृष्टी अनुदान तातडीने वाटप करा.
५. पीक नुकसानीच्या प्रमाणात पीकविमा वितरित करा व वितरणात पारदर्शकता आणा.
६. वन्य प्राण्यांपासून शेती वाचवण्यासाठी शंभर टक्के अनुदानित कुंपनाची सुविधा द्या.
या मोर्चासाठी किसान सभा धारूर तालुका कमिटी, अंजनडोह, रुई धारूर, असोला, कोळ पिंपरी, पांगरी, चिंचपूर, गंजपूर, थेट्टेगव्हाण, आरणवाडी,धारूर इत्यादी गावातील शाखा सदस्य, शेतकरी पुत्रांनी ट्रक्टर मालकांनी अथक परिश्रम केले..