बनसारोळा येथे अविनाश धायगुडे यांचा भव्य नागरी सत्कार
युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य

केज दि २७(प्रतिनिधी)
तालुक्यातील बनसारोळा चे भूमिपुत्र अविनाश वैजनाथ धायगुडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच भीमराव गोरेमाळी ,प्रमुख उपस्थिती वैजनाथ धायगुडे, डॉ.हनुमंत सौदागर यांची होती.
ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सामान्य कुटुंबातील अविनाश धायगुडे यांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारा महाराष्ट्रभर काम करत आहेत.उत्तम वक्ते आणि शैली यामुळे पक्षाने त्यांच्यावर युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली याबद्दल भूमिपुत्राच्या नियुक्तीने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामीण भागातील तरुण नेतृत्व उभं राहत आहे या भागाला त्याचा उपयोग होईल. सर्वसामान्यांचा आवाज होऊन प्रश्न मांडतील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.अँड दयानंद लोंढाळ यांनी बोलताना म्हणाले युवकांनी खरी क्रांती केली मराठवाडयाचे कणखर नेतृत्व तयार होत आहे.
अँड राजेंद्र धायगुडे यांनी गावचं लेकरू मोठे होऊन नाव करत असल्याचा सर्वांना आनंद आहे असे मत व्यक्त केले. तानाजी जोगदंड यांनी सबंध राज्यभर बनसारोळ्याचा डंका वाजेल.कल्याण गोरेमाळी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.युवराज काकडे यांनी शुभेच्छा देऊन गावचे नाव मोठे होत असल्याचे मत व्यक्त केले. अजय काळे यांनी उंच झेप घ्या असे मत व्यक्त केले. राजकीय वाटचलीसोबत सामाजिक संघर्ष कायम करत राहील. बनसारोळा येथून झालेला सत्कार कायम स्मरणात राहील अशा भावना सत्कारमूर्ती अविनाश धायगुडे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर तुकाराम सुवर्णकार यांनी केले तर आभार साईनाथ जोगदंड यांनी मानले कार्यक्रमास परिसरातून पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.