आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कॉम्रेड प्रकाश यांच्या वारसाच्या वाढदिवसानिमित्त गावभर केला प्रकाश

वैभवशाली महाराष्ट्र न्युज विशेष

बीड जिल्हा प्रतिनिधी

दिंद्रुड परिसरातील सदन व नावाजलेले गाव म्हणजे नाखलगाव. या गावांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. या गावाला ऐतिहासिक क्रांतिकारी चळवळीचा वारसा देखील आहे. तो म्हणजे कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांचे सहकारी असलेले कॉम्रेड प्रकाश झोडगे यांचेच हे गाव.

कॉम्रेड प्रकाश झोडगे यांनी संपूर्ण हयात सर्वसामान्य, कष्टकरी, दुबळ्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले. आज ते हयात नाहीत.

पण त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीमध्ये दाखवत त्यांचे वारस असलेले कॉम्रेड सुहास झोडगे व व त्यांचे संपूर्ण परिवार यांनी देखील चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलेल आहे. नाकलगाव ग्रामपंचायत गेल्या 25 वर्ष माकपकडे असताना गावामध्ये विविध विकासाची कामे या परिवाराच्या हातून झालेली आहेत.

या पंचवार्षिक मध्ये मात्र ग्रामपंचायत यांच्या ताब्यात नाही. गेल्या कित्येक दिवसापासून गावाच्या खांब्यावरील दिवे बंद पडले असल्याकारणाने गावात अंधारात आहे.

याच अंधारावर तोडगा काढत कॉम्रेड प्रकाश झोडगे यांचे बंधू रमेश झोडगे यांनी कुठल्याही सरकारी योजनेची वाट न बघत बसता स्वतःचा पुतण्या कॉम्रेड सुहास झोडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील सर्व खांब्यांवरती एलईडी (LED) बल्ब लावले आहेत. यासाठी एकूण खर्च सव्वा लाख रुपये आला असून हा खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला आहे. या कृतीशील उपक्रमाचे सर्वत्रच प्रचंड कौतुक होत आहे. याप्रसंगी सरपंच विठ्ठल गवळी,पांडुरंग झोडगे, राधाकिसन शिंदे, रामहरी शिंगारे, लक्ष्मण भैय्या सोळंके, भागवत शेळके, सुरेश बप्पा झोडगे, राज झोडगे, विजय झोडगे, निवास गुजर, पांडुरंग पाटेकर, अनिल उंचे, दत्ता पवार, अब्दुल शेख, गोरख सवाशे, सखाराम ताटे, अनुरथ शिंदे, केशव काळे, रमेश गायकवाड, बालासाहेब गवळी, अजय पवार, अमोल शिंगारे, यांच्यासह आदी गावकरी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.